18 वर्षावरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

- Advertisement -

आज 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. यासाठी Co-Win अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य असणार नाही. ज्यामुळे दररोज होणाऱ्या लसीकरणाच्या तुलनेत आता लसीकरणात वाढ होण्याची शक्यता आहे. Free vaccinations for all 18-year-olds from today

या टप्प्यात दररोज 50 लाख लोकांना लस देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत, दररोज 40 लाखांपेक्षा कमी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयांकरिता 25 टक्के लसींची खरेदीची खात्री केली आहे. त्यानुसार सरकारने खासगी क्षेत्राला या टप्प्याचा भाग बनवण्यास पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे केंद्राच्या या निर्णयामुळे कोणत्याही खासगी रुग्णालयात कोरोना लसीसाठी जास्त पैसे आकारले जाणार नाहीत. कारण या लसीची किंमत निश्चित करण्यात आली आहे.

मोठी बातमी| मोदी सरकार 21 जूनपासून १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण मोफत करणार

आज 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल त्यांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेता येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles