पुणे: सारथीच्या धर्तीवर ओबीसी VJNT विद्यार्थ्यांना महाज्योती(Mahajyoti) संस्थेच्या माध्यमातून दिल्ली आणि पुणे येथे UPSC, MPSCच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी पाठवले जातात. अशा विद्यार्थ्यांना आकस्मित निधी, विद्यावेतन देणे जरुरीचे असते. यावर्षी दिल्ली येथे 800 विद्यार्थी व पुणे येथे 2000 विद्यार्थी पाठवले आहेत. सारथीच्या धर्तीवर दिल्लीतील विद्यार्थ्यांना 18000 रुपये आकस्मित निधी देण्यात आला परंतु पुणे शहरात रूम डिपॉझिट, रूम भाडे, लायब्ररी फी, मेस यासाठी आकस्मित निधी मिळणे गरजेचे असताना महाज्योतीने यावर अजूनही कोणती कारवाई केलेली नाही तेव्हा काही ग्रामीण गरीब विद्यार्थी पुणे सोडून परत गावाकडे जाण्याचा मार्गवर आहे. या विरोधात पुण्यात विद्यार्थी आक्रमक झालेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
महाज्योती(Mahajyoti) सुरू झाल्यापासूनच आतापर्यंत अधिकाऱ्याद्वारे लेटलतीफपणा, अकार्यक्षम अपारदर्शकता व भोंगळ कारभार केला गेला एकही योजनेतील विद्यार्थी समाधानी नाहीत तेव्हा अशा व्यवस्थापकीय संचालकांना तात्काळ हटवून योग्य व्यक्तीची निवड करावी.
शाम खरात
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.