भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वत्र गाव चलो अभियान सुरू आहे. अगदी सदस्यापासून ते केंद्रीय नेतृत्वापर्यंत सर्वजण या अभियानात सहभागी होत मुक्कामी प्रवास करत आहेत. कोल्हापूर मधील भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते ही गाव चलो अभियानांतर्गत वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या. यादरम्यान ते समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा,अंगणवाडी,महिला बचत गट, ग्रामपंचायत कार्यालय, नव मतदार, जेष्ठ कार्यकर्ते, समाजातील प्रतिभावंत व्यक्ती व खेळाडू अशा सर्वांशी भेटी घेऊन गाव चलो अभियान कोल्हापूरातील नेत्यांनी पूर्ण केले.
या दरम्यान कोल्हापूर मधील राज्यसभा खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक, समरजीतराजे घाटगे, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, शौमिका महाडिक जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई,राजवर्धन निंबाळकर हे देखील या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि कोल्हापूर लोकसभा सहसंयोजक राहुल चिकोडे हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या खानापूर या मूळ गावी भेट दिली.यावेळी खानापूरचे ग्रामदैवत तळेमाऊलीचे दर्शन घेऊन आपल्या अभियानाची सुरुवात केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा खानापूर या ठिकाणी भेट देऊन शाळेबाबत विचारपूस केली विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना खाऊ वाटप केला. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिमा शाळेस भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहचतो का हे पाहून जे लोक अजूनही योजनांपासून दूर आहेत त्यांना योजनांचा लाभ राहूल चिकोडे यांनी मिळवून दिला. राहूल चिकोडे हे वाचन प्रेमी आहेतच हे आजही दिसून आले. त्यांनी जनसेवा ग्रामीण वाचनालयाला देखील भेट दिली. गावचा कारभार चालवणाऱ्या विविध संस्था, डेअरी यांनाही त्यांनी भेट दिली.
वारकरी संप्रदाय हा आपला कणा समजला जातो. राहूल दादा रात्रीच्या वेळी वारकऱ्यांसोबत भजनामध्ये तल्लीन झाले.त्या दिवशी खानापूर मध्ये मुक्काम केला.दुसऱ्या दिवशी सकाळी दूधगंगा नदीकाठी फेरफटका मारून नदीच्या संरक्षण भिंतीची पाहणी केली. यावेळी वाटेत युवा मित्र मंगेश यांच्या जाणावरांच्या गोठ्याची त्यांनी पाहणी केली.
चोवीस तास खानापूर मध्ये राहिल्यानंतर परतताना शेखर पाटील यांच्या घरी लग्नसोहळ्यास उपस्थित देखील त्यांनी लावली. एकंदरीत चोवीस तास खानापूर या गावी राहून त्यांनी हे अभियान यशस्वी पूर्ण केले.