जेई पदासाठी बीई-बिटेक ही डिग्री असणे disqualification नाही.
उच्च शिक्षण किंवा पात्रता, नोकरी मिळण्यासाठी दोष किंवा अवगुण मानला जावू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे. राज्य विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता (जेई) पदांवर बीई-बीटेक पदवी धारकांची भरती करण्याच्या हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.
न्यायमूर्ती यूयू ललित आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट्ट यांच्या खंडपीठाच्या लक्षात आले की नियुक्त्यांचा मोठा भाग थेट भरतीद्वारे घेण्यात आला आहे. त्याच वेळी प्रोमोशन ने भरण्यात येणारी उच्च पदे जसे सहाय्यक अभियंता थेट भरती 36% पर्यंत होती. उर्वरित 64 टक्क्यांमध्ये फीडर केडरसाठी विविध उप-कोटा निश्चित करण्यात आला असून यामध्ये कनिष्ठ अभियंत्यांचा वाटा सर्वाधिक आहे. खंडपीठाने आपल्या आदेशामध्ये असे म्हटले आहे की हे नियम तयार करण्याचे उद्दीष्ट पदवीधारकांना कनिष्ठ अभियंता पदाचा विचार करण्यापासून दूर ठेवणे नाही.
[…] […]