hindkesari 2023| अभिजीत कटके हिंद केसरी; पटकावली मानाची गदा!

hindkesari 2023

हैद्राबाद येथे पार पडलेल्या हिंद केसरी (hindkesari 2023) स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली. अभिजीतच्या विजयामुळे यंदाची मानाची हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला चितपट केलं.

urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली

SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सावळागोंधळ

MPSC Mains | सरकारच्या नाकर्तेपणामुळे उमेदवारांवर पुनःश्च आंदोलनाची वेळ

पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे | PSI physical test

भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची समजल्या जाणार्‍या हिंद केसरी स्पर्धेत पुण्याच्या पैलवानने बाजी मारल्याने पुण्यात जल्लोष करण्यात आला. या हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला मात दिली. अभिजीतने सोमवीर याला 4-0 अशा फरकाने पराभूत केलं.अभिजीत कटकेने 2017 सालचा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. तसेच अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com