Thursday, May 9, 2024

राजर्षी शाहूंच्या विचारांचा खरा वारसदार मी- राजवर्धन कदमबांडे

- Advertisement -

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पणतू आणि प्रिन्सेस पद्माराजे यांचा ज्येष्ठ चिरंजीव म्हणजे मी शाहू महारजांच्या विचरांचा खरा वारसदार आहे. कॉंग्रेसचे उमेदवार त्यांच्या संपत्तीचा वरसा सांगतात. पण त्यांचे विचार जनतेच्या मनात रुजवणारा त्यांचा रक्तामांसाचा खरा वारसदार मीच आहे, असे सशक्त विधान धुळे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रचारप्रमुख राजवर्धन कदमबांडे (Rajavardhan Kadambande) यांनी सांगितले.

महायुतीच्या कोल्हापूर आणि हातकणंगले विधानसभेतील उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्राचारासाठी कदमबांडे कोल्हापूर दौर्‍यावर आले असताना त्यांनी पत्रकार परिषदेतून जनतेला महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले. त्यावेळी ते बोलत होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज हे जनतेत मिसळतात, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना साजेस काम त्यांनी केल्याच माझ्या ऐकिवात नाही. त्यांनी शाहू महाराजांना केवळ कोल्हापूरपुरतं मर्यादित केलं आहे. पण राजर्षी शाहू महाराज हे केवळ महाराष्ट्रच नाही तर अवघ्या भारताचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांचा खरा वारसदार या नात्याने त्यांचे विचार लोकांमध्ये पसरवण्याचं काम मी केलं.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटील गटाला धक्का; लोकनियुक्त सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश

दत्तक प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले, 1962 मध्ये कोल्हापूरात दत्तक प्रकरण गाजलं. ज्यांना दत्तक म्हणून घेता आलं नाही त्यांच्या गादीचा मान हा विषयच येत नाही. कुणी सांगितलं ते गादीचे वारसदार आहेत म्हणून, खरा वारसदार कोण हे जनता ठरवेल. ते शाहूंच्या संपत्तीचेे वारसदार असतील पण त्यांच्या विचारांचा खरा वारसदार मीच असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. चौकट कुणाचा पाठींबा घ्यायचा हे त्यांनी ठरवावे : कदमबांडे गेल्यावेळी निवडणुकीत मी धुळे शहरामधून अपक्ष निवडणूक लढवली. एमआयएम चा उमेदवार माझ्या विरोधात 2300 मतांनी निवडून आला. त्यावळच्या मुस्लीम राजांनी, सुलतानांनी हिंदूंची मंदीरे पाडली. त्यामुळे त्यांचा पाठींबा घ्यायचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles