Friday, March 24, 2023
No menu items!
Homeराजकारणवरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू -नितेश...

वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू -नितेश राणे

भाजप आणि शिवसेना युतीची चर्चा बंद होती पण आजचे चित्र पाहिल्यानंतर युतीची चर्चा करणाऱ्यांना चांगली झोप लागेल. याला कारण ही असेच आहे. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू असं वेगळे राजकीय संकेत भाजप आमदार नितेश राणेंनी दिलेत. कोकणात शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये होणारे जुगलबंदी ही काही नवी बाब नाही. सेना आणि राणे यांच्यातील राजकीय कलगीतुरा नेहमी रंगलेला असतो. If the seniors give orders, we will work together – Nitesh Rane

आज सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे एक वेगळंच पहायला मिळालं. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वेंगुर्ले सागररत्न मत्य बाजारपेठे लोकार्पणाच्या निमित्ताने विनायक राऊत आणि नितेश राणे एकत्र येताना दिसले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दीपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते. राणे आणि सेना यांच्यातील राजकीय वैर नेहमी पहायला मिळते. मात्र यावेळी चित्र उलट होते.

खासदार विनायक राऊत यांचं मोठ मन 

जेंव्हा नितेश राणे हे भाषण संपवून व्यासपीठाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची पाठ थोपटली. खासदार विनायक राऊत यांनी जाहिर भाषणात आपण आणि नितेश राणे मित्र असल्याचं बोलून दाखवलं. मी नितेश राणे यांचे अभिनंदन करतो. अभिनंदन करायला सुद्धा मोठं मन लागतं असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी कोकणातले राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्र येतात याची झलक दाखवली. यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आल आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular