Saturday, April 1, 2023
No menu items!
Homeआरोग्यवैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन|DCM Devendra...

वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन|DCM Devendra Fadnavis

भंडारा, दि. 3 : जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज  करण्यात आले.

यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके यांच्यासह  जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.दीपक सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर उपस्थित होते.

राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार – मुख्यमंत्री |Balasaheb Thackeray Aapla Davakhana

माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियांतर्गत जिल्ह्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी पालकमंत्री श्री.फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात पाच दिव्यांगाना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वितरीत करण्यात आले. आरोग्य विषयक स्टॉलची पाहणी देखील पालकमंत्र्यांनी केली. चार दिवस चालणाऱ्या या आरोग्य शिबिरात आज पहिल्याच दिवशी एक हजारहून अधिक रूग्णांनी नोंदणी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular