उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उमेदवार हे बंडखोरीच्या वाटेवर आहेत. येणाऱ्या काही दिवसात बंडखोरांना शांत करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची दमछाक होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर, करवीर, इचलकरंजी, राधानगरी, चंदगड, हातकणंगले , शिरोळ या मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत बंडखोर उमेदवारांची समजूत काढली जाणार आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभेची चर्चा चांगलीच रंगली आहे कारण तिकिटासाठी राजेश लाटकर (rajesh latkar) यांचे नाव पुढे आले त्यांना उमेदवारी जाहीर झाली परंतु , त्यांना काँग्रेसमधून प्रचंड विरोध झाला आणि अनेक गट नाराज असल्यामुळे त्यांची उमेदवारी काढून मधुरिमाराजेंना रिंगणात उतरवण्यात आले आहे. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात बंडखोरी होणार कि मगर घेली जाणार हे पाहणे उत्सुकतापद आहे.
करवीर विधानसभा:
करवीरमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या गेल्या आहेत. शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील(p.n.patil) यांचे चिरंजीव राहुल पाटील(rahul patil) यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. परंतु विनय कोरे यांनी जनसुराज्यकडून संताजी घोरपडे यांना मैदानात उतरविले आहे त्यामुळे महायुतीमध्ये या मतदारसंघात तेढ निर्माण होवू शकतो.
राधानगरी आणि चंदगड:
राधानगरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार के.पी. पाटील आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्यात थेट लढत आहे परंतु ए. वाय. पाटील यांच्या बंडखोरीमुळे के.पी. पाटील यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदाताई बाभुळकर यांना आव्हान देण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील आणि भाजपचे शिवाजी पाटील या दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाजी पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
हातकणंगले आणि शिरोळ:
हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघांमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली ठाकरे गटातील दोन माजी आमदारांनी स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये बंडखोरीचं वातावरण निर्माण झालं आहे. इचलकरंजीत भाजपनेते हिंदुराव शेळके यांनी बंड पुकारून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदन कारंडे यांना पाठिंबा दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील या राजकीय घडामोडींमुळे आगामी निवडणुकांची चुरस वाढली आहे. बंडखोरीचे हे वातावरण महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांसाठी एक मोठा चॅलेंज आहे. येणाऱ्या काळात हे उमेदवार बंडखोरी करणार कि माघार घेणार हा येणारा काळ ठरवेल.