कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात.

- Advertisement -

कोल्हापूरच्या नाट्य क्षेत्रातील मान बिंदू आणि कलाकार रसिक यांची नाट्य पंढरी म्हणून ओळख असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह (keshavrao bhosle theatre) वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने १९१५ साली झाली होती. या वास्तूत संगीत, नाट्य कलेची बीजेदेखील रुजली गेली. दि ९ ऑगस्ट रोजी याच केशवराव भोसले यांची जयंतीची तयारी सुरु असताना अचानक लागलेल्या आगीने पूर्ण कोल्हापूर हळहळले अग्निशामक दल आणि कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने आग विजवली पण तरी देखील अंदाजे ५० कोटींचे नुकसान झालेले सांगण्यात येत आहे.

काही क्षणात आगीने घेतले रौद्ररूप.

केशवराव भोसले नाट्यगृहात (keshavrao bhosle theatre) साडेनऊच्या सुमारास खासबाग मैदानाकडून लागलेले आग अवघ्या अर्ध्या तासात प्रेक्षक गॅलरी कडून पसरत गेली. आगीचे लोट छतापर्यंत पोहोचून सर्वच क्षणार्धात कोसळले. यासोबतच दोन्ही बाजूंच्या भिंतींना तडे गेले जनरेटरचा स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली. आग सर्वत्र पसरत होती आणि यामध्येच एक जनरेटर होता त्याला आग लागल्याने त्याचा स्फोट झाला आणि सर्वांची धावपळ सुरू झाली तिने रौद्ररूप धारण केले होते या पाठोपाठ एसी आणि काही सिलेंडरचा ही स्पोर्ट झाला आणि यामुळे अजस्त्र अशा भिंतींनाही तडे गेले. नाट्यगृहांमध्ये आसणे, लाकडी साहित्य, पडदे आणि इतर सर्व गोष्टींना आगीचे लोट बेचीराख करत होते.

कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी अग्निशामन दलाचे सर्व कर्मचारी सर्व बंब तसेच विमानतळावरील फायर फायटरनाही बोलवण्यात आले नाट्यगृहाचे सर्व पदाधिकारी आजूबाजूच्या तालमीचे पैलवान आणि ज्या कोल्हापूरकरांना बातमी समजली ते सर्व कोल्हापूरकर ही आग विझवण्यासाठी धावपळ करत होते. गॅलरीतून उठलेल्या आगीचे लोट छतापर्यंत जाऊन पोहचले यामुळे छताचा भाग पेठ घेण्यास सुरुवात झाली भिंती दगडाच्या असल्याने त्याला फारसं नुकसान झालं नाही अग्निशामक जवानांनी तो भाग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पण सर्व खिडक्यांमधून धूर बाहेर पडू लागला आणि त्यांना देखील मर्यादा आली आणि अशातच छताचा भाग गॅलरी मधून खाली कोसळला.

कलाकारांच्या काळजाचा ठोका चुकला.

आगीची बातमी वाऱ्यासारखी कोल्हापूर मध्ये पसरली कोल्हापुरातली रसिक जनता नाट्यगृहाकडे धावपळ करत येत होती यामध्ये नाट्यगृहाकडील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले या ठिकाणचे दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि ते जीवाच्या आकांताने रडू लागले रंगमंचा मागील दरवाजा उघडून काही खुर्च्या साहित्य वाचवण्यासाठी खिडकीतून प्रवेश करून साहित्य बाहेर काढण्यासाठी धडपड सुरू झाली.

 

कोल्हापुरातील सर्व पक्ष नेत्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहला (keshavrao bhosle theatre) भेट दिली आणि निधीची घोषणा देखील केली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी यांनी आपल्या आमदार, खासदार फंडातून निधी देवून कोल्हापूरची अस्मिता पुन्हा उभी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. केशवराव भोसले नाट्यगृह सर्वपक्षीय नेत्यांच्या सोबतीने आणि कोल्हापूरकरांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा उभे देखील राहील. पण ते नव्याने उभा राहिलेलं रूप शाहूंच्या आठवणी ज्या भिंती जी गॅलरी जे स्टेज आणि जी वास्तु सर्व कलाकारांना आणि कोल्हापूरच्या रसिक प्रेक्षकांना देत होत्या त्या आठवणी आणि आठवणींमधली ऊब पुन्हा तशीच मिळणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतच..?

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles