कॉंग्रेसच्या स्वयंघोषित पुरोगाम्यांचा कुटील डाव ओळखा -समरजितसिंह घाटगे

- Advertisement -

कोल्हापूर : कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात मोदीजींनी हटवलेलं 370 कलम पुन्हा लागू करणार, सीएए कायदा रद्द करणार आणि ट्रिपल तलाक पद्धत पुन्हा सुरु करणार अशा गोष्टी आहेत. ज्या राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचं नाव घेवून कॉंग्रेसचे हे स्वयंघोषित पुरोगामी देशविघातक खलबत करत आहेत, ती वेळीच ओळखा. त्यामुळे मोदीजी, मोदीजींचं व्हिजन आणि मोदीजींनी केलेला विकास यावरच मतदान होणं आवश्यक असल्याचं स्पष्ट मत भाजपाचे समरजितसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांचे सच्चे पुरोगामित्व, त्यांचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधानाला वाचयवायचं काम मोदीजींनी केलं आहे. त्यातील एक गोष्ट म्हणजे मोदीजींनी रद्द केलेलं 370 कलम. आज ज्या अल्पसंख्यांकांच्या बाजूने कॉंग्रेस उभं असल्याची नाटक करत आहे, त्या कॉंग्रेसनेच काश्मिरमध्ये 370 कलम लागू करुन मुस्लिम तरुणांच्या हातात दगड दिले. कारण तिथे रोजगार नव्हते, नैराश्य होतं. कारण इतकं मोठं पर्यटन स्थळ पण तिथे एकही फाईव्ह स्टार हॉटेल होवू शकलं नाही.

370 कलामानुसार कुणालाही तिथे लँड ऍक्विझिशनचे अधिकार नव्हते. हे कलम मोदीजींनी रद्द केल्यानंतर किती झपाट्याने काश्मिरचा विकास झाला. तरुणांच्या हाती रेाजगार आला. इतकच नाहीतर भाजपाच्या कट्टर विरोधक असणार्‍या मायावतींदेखील आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण केलं म्हणून मोदीजींचं कौतुक केलं होतं. हेच कलम कॉंग्रेस पुन्हा आणू पाहात आहे. ट्रिपल तलाकबाबत बोलताना ते म्हणाले, आज कॉंग्रेस महिला आत्मसम्मानाबाबत बोलते, मग मुस्लिम महिलांना आत्मसन्मान नाही का? राजर्षी शाहू महाराजांनी मुलीच्या लग्नां वय 12 वरुन 16 केलं, विधवा विवाहांना मान्यता दिली, मुलींवर क्षिणाची सक्ती केली, मुलींना त्यांच्या आई वडिलांच्या संपत्तीत अधिकार दिला. मुस्लिमांमधली ट्रिपल तलाकवर बंदी आणली. तोच कायदा कॉंग्रेस पुन्हा आणू पाहात आहे, तेव्हा आ स्वयंघघेषित पुरोगाम्यांचा हा कुटिल डाव वेळी ओळखून सावध व्हा, असा इशाराही समरजिंतसिंह घाटगे यांनी दिला.

नागरीकता काढून घेण्याचा एक क्लॉज दाखवा : खुले आव्हान मोदीजींनी लागू केलेल्या सीएए ऍक्टमध्ये हिंदू, पारसी, ग्रिश्चन, शीख, बुद्धीस्ट अशा परदेशातून भारतात आलेल्या शरणार्थींसाठी नागरीकता देण्याची तरतूद आहे. पण कॉंग्रसने इथही मोदीजी नागरीकता काढून घेण्याचा कायदा करत असल्याचं सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. अशा सवयंघोषित पुरोगाम्यांना या कायद्यामध्ये कुणाचीही नागरीकता काढून घेण्याचा उल्लेख असणारा एक़ तरी क्लॉज दाखवा, असे खुले आव्हानही समरजितसिंह घाटगे Samarjitsinh Ghatge यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles