Friday, September 13, 2024

kolhapur loksabha |कोल्हापूर लोकसभेसाठी आघाडीच ठरलं; शाहू महाराज निवडणूक रिंगणात ?

- Advertisement -

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा राजकीयदृष्ट्या प्रमुख मानला जातो. कारण, कोल्हापूरच्या राजकारणात जी समीकरणे जुळवली जातात ती महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येताना दिसतात. कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी सर्वच नेते आग्रही आहेत. कॉँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनीही ही जागा कॉँग्रेसच्या पदरात पाडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट या जागेसाठी ठाण मांडून बसेलेला आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला किंवा कॉँग्रेसला सोडतील अशी चर्चा चालू असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पक्षातून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे.

संभाजीराजेंना सोबत घेण्याबाबत मविआत एकमत

संभाजीराजे यांनी स्वत:चा स्वराज्य म्हणून पक्ष स्थापन केला आहे. तसेच ते यापूर्वीदेखील राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी दीड वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीवेळीदेखील शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. पण शिवसेनेकडून काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्या अटी संभाजीराजे यांनी मान्य केल्या नव्हत्या. आमच्यावर 2009 मध्ये झालेल्या जुन्या जखमा आम्ही अजूनही विसरलो नाही. आमच्यावर कोणीही वार करू शकत नाही. मविआ सोबत  निवडणूक लढवायची असेल तर त्यातील कोणत्याही एका पक्षातून निवडणूक लढवावी लागेल असे मविआ च्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. या बाबत संभाजी राजेंनी आपण स्वराज्यपक्ष कायम ठेवणार असल्याचे बोलले आहे. त्यामुळे संभाजीराजे लढणार की नाही लढणार हे वेळच ठरवेल. पण याचवेळी त्यांचे वडील श्रीमंत शाहू महाराजांचे नाव चर्चेत येत आहे.

Kolhapur LokSabha| २०२४ ची निवडणूक प्रतिष्ठेची;उमेदवारीवरून रस्सीखेच

कोल्हापूर लोकसभेसाठी शिवसेना तह करणार का?

कोल्हापूर लोकसभेत सध्या शिवसेनेचे खासदार आहेत. पण सध्या ते शिंदे गटामध्ये सत्तेत आहेत. त्यामुळे ठाकरे गटातून उमेदवार मिळत नसल्याने या जागेसाठी अदलाबदली करून ही जागा राष्ट्रवादीला सोडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडीतील सर्व नेत्यांच्या जवळचे असणारे शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे.

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांना कोण देणार आव्हान ?

शाहू महाराजांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत

शाहू महाराज आणि शरद पवार यांची मैत्री पूर्वीपासून सर्वज्ञात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली होती. या सभेचे अध्यक्षपद कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी भुषवले होते. यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र शाहू महाराज यांनी मला यापूर्वी लोकसभा लढवण्याची इच्छा होती पण आता मी निवडणूक लढवणार नाही असं म्हणत उमेदवारी संदर्भात राजकीय चर्चा आणि संभ्रम कायम ठेवला होता.

महाविकास आघाडी कडून जिल्ह्यातील दोन्हीपैकी एक जागा काँग्रेसला मिळावी अशी काँग्रेस श्रेष्ठीकडून मागणी करत आहेत, मात्र जर राष्ट्रवादीकडून शरद पवारांनीच थेट कोल्हापूरच्या जागेबाबत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यास सर्व समावेशक चेहरा म्हणून श्रीमंत शाहू महाराजांचा विचार होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोल्हापूरच्या राजघराण्याला राज्यात मोठा मानसन्मान आहे. यापूर्वी छत्रपती मालोजीराजे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत विधानसभा गाठली होती. तर आताच्या स्वराज पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती कोट्यातून भारतीय जनता पक्षाने खासदारकी बहाल केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles