कोल्हापूर-गोवा विमानसेवा सुरु: खासदार धनंजय महाडिकांच्या पाठपुराव्याने |

- Advertisement -

कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती कोल्हापूर ते दिल्ली आणि गोवा विमानसेवा सुरु करण्याची. कोल्हापूर ते दिल्ली थेट विमानसेवेचा निर्णय झाल्यानंतर आता, कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर ते गोवा विमानसेवा (Kolhapur to Goa Flight) सुरु होणार आहे. 19 आणि 22 सप्टेंबर रोजी दोन दिवस विशेष विमानसेवा असेल, यासाठी स्टार एअर कंपनीचे विमान असणार आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी या विमानसेवेसाठी पाठपुरावा केला होता. आठवड्यातील दोन दिवस विमानसेवा सुरु असणार आहे, अवघ्या काही मिनिटात गोव्याला जाता येणार आहे.

कोल्हापूर ते गोवा विमानसेवा सुलभ

कोल्हापूर ते गोवा

सकाळी 11.30 ते 12.30
19 सप्टेंबर 3750 रुपये
22 सप्टेंबर 3250 रुपये

गोवा ते कोल्हापूर

दुपारी 01.00 02.00
19 सप्टेंबर 3250 रुपये
22 सप्टेंबर 3750 रुपये

कोल्हापूर-हैदराबाद, हैदराबाद कोल्हापूर आणि कोल्हापूर-गोवा(Kolhapur to Goa Flight) अशी ही दैनंदिन सेवा सुरू होईल. या दृष्टीकोनातून नियोजन केले जात आहे. कोल्हापूर ते तिरुपती व कोल्हापूर मुंबई विमानसेवाही सुरू आहे.याचबरोबर कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा ही 25 सप्टेंबर पासून सुरु होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे. राज्यसभा  खासदार धनंजय महाडिक यांनी 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. कोल्हापूर विमानसेवा सुरळीत सुरु झाली तर आर्थिकदृष्ट्या कोल्हापूरचा विकास जलद गतीने होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles