कोल्हापूर Kolhapur पोलिसांसह मनोरंजन विभागानेही परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.| Gautami Patil
सध्या गणेशोत्सवात पोलिस प्रशासनावर सुरक्षेचा ताण खूप आहे. त्यामुळे गौतमी पाटील Gautami Patil यांच्या (Gautami Patil) कोल्हापुरातील Kolhapur दोन्ही कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गौतमी पाटील यांचे कार्यक्रम जिथे असतात तिथे सुरक्षेमुळे पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा द्यावी लागते. आता गणपतीमुळे ते शक्य होणार नसल्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात होणारे गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोल्हापूर पोलिसांसह मनोरंजन विभागानेही परवानगी नाकारली आहे.
PM Kisan 15th Installment 2023: Check Date and Beneficiary List
22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे Gautami Patil कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उत्सव काळात कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देऊ शकत नसल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. तसेच दुसरीकडे, गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारतानाच कोल्हापूर Kolhapur पोलिसांनी तब्बल सात हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवात व्यत्यय निर्माण करण्याची शक्यता आहे अशा 3816 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 2219 जणांकडून चांगल्या वर्तणुकीच्या जामीनासह बॉन्ड घेण्यात आले आहेत. 171 जणांकडून चांगल्या वर्तणुकीचे बॉन्ड घेणेत आलेले आहेत. तिघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सणाच्या कालावधीत हद्दीमध्ये, मंडळाजवळ अथवा मिरवणुकीमध्ये प्रवेश करणेस 641 जणांवर मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अशा एकुण 6 हजार 850 जणांविरुद्ध फौजदारी प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात आली आहे.