राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता ऑनलाईन बैठक होणार आहे. लॉकडाऊन आणि कोरोना परिस्थिती संदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात काही निर्णय होणार आहे का याकडे 10वी, 12वी तसेच mpsc च्या विद्यार्थ्यांचेही लक्ष लागले आहे.
11 तारखेला संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. पण मुलांमध्ये सध्या भितीचे वातावरण पसरले आहे.
काल एका विद्यार्थ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आम्हाला आमचा जीव महत्वाचा आहे अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यामधून येत आहेत.
औरंगाबाद शहरामध्ये mpsc करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे कोरोना रिपोर्ट positive आलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना कोरोना ची लक्षणे ही दिसत आहेत. पण भीतीमुळे ते विद्यार्थी हॉस्पिटल मध्ये जात नाहीत या अशा परिस्थितीत परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकताच राहिलेली नाही त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा शेवटचा attempt आहे.
आमच्या शहरामध्ये एमपीएससी करणार्या खूप विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. काही विद्यार्थी positive आहेत. त्यामुळे 11 तारखेला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा ही कमीत कमी एक महिना पुढे ढकलावी. असे निवेदन मेल द्वारे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहे.
अविनाश दांडगे
MPSC, विद्यार्थी, औरंगाबाद.
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे मी स्वतः positive आहे. माझ्या सारखे असे खूप स्पर्धकमित्र परीक्षा देता येणार नाही या भीतीने लक्षणं दिसत असूनही टेस्ट करत नाहीआहेत, कारण टेस्ट केली तर हॉस्पिटल ला जाव लागेल. अभ्यासावर खूप परिणाम होत आहे
प्रतीक कदम. ( mpsc विद्यार्थी)
माझी कोरोना टेस्ट पॉजिटिव असल्यामुळे 8 दिवसापासून मी Quarantine आहे. एमपीएससीच हा शेवटचा Attempt असल्यामुळे संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी.
.राहुल शंकर पवार ( औरंगाबाद )
कोरोनाचे खूप प्रमाणात वाढत आहे. काही लोकांना त्याचा अंदाज नाही की कोरोना किती भयानक आहे. जी लोकं या मधून गेली आहेत/positive आहेत त्यांना या परिस्थितीच गांभीर्य समजले आहे. एकंदरीत सर्व परिस्थितीचा आढावा घेवून मुख्यमंत्र्यांनी यावर योग्य तो निर्णय घ्यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होणार नाही.
नियम पाळा, कोरोना टाळा
कोरोनाचे गांभीर्य समजून घ्या.
परिस्थिती खूप गंभीर असल्याने येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षे बाबत सरकार जो काही निर्णय घेईल त्यास सहकार्य करा.
कोणतेही लक्षण दिसल्यानंतर लवकर टेस्ट( early detection decreases death rate) करुन उपचार घेणे आवश्यक आहे.
शक्यतो बाहेर जाणे, बाहेरचे खाणे टाळा.
मास्कचा वापर करा.
स्वत:ची काळजी घ्या.