Tuesday, June 18, 2024

loksabha election 2024 | पुणे लोकसभेत विजयाचा गुलाल कोण उधळणार?

- Advertisement -

सहकारी चळवळ आणि साखरेचा पट्टा असणारा तसेच राज्याच्या राजकारणाला नियंत्रित करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही ठीकाणचा निकाल हा शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहे. या निकालाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर तसेच सहकार चळवळीवर होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील निवडणूक साखरेचा भाव, दुधाचा दर, विकास आणि महापूर या मुद्यांवर चालते. यामध्ये पुणे लोकसभेकडे (pune loksabha) loksabha election 2024 सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. loksabha election 2024

पुणे लोकसभा | loksabha election 2024

स्वातंत्र्यानंतरची पहिली काही दशके पुण्यातील राजकारणावर काँग्रेस आणि समाजवादी पक्षांची पकड होती. पुणे म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्लाच  नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर मात्र पुण्यातील काँग्रेसचा बालेकिल्लाच उद्ध्वस्त झाला आणि २०१४ तसेच २०१९ या निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला २०१९ मध्ये गिरीश बापट यांनी तीन लाख २४ हजारांचे मताधिक्य घेत काँग्रेसची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे.

यंदाच्या loksabha election 2024 निवडणुकीत महायुतीकडून पुण्याचे माझी महापौर मुरलीधर मोहळ तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तसेच वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे तात्या हे निवडणूक रिंगणात आहे. पण तुल्यबळ लढत ही धंगेकर विरुद्ध मोहळ अशीच झालेली दिसते.

मोदी प्रतिमा, गेल्या दोन निवडणुकांमधील विक्रमी विजय, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ यामुळे भाजपच्या गोटात पहिल्यापासून आत्मविश्वास आहे. पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराची शिस्तपूर्ण यंत्रणा यांनी घरोघरी संपर्क, प्रचारफेऱ्या, सुमारे एक हजार कोपरा सभा, समाजघटकांचे मेळावे आदी हे पूर्ण झाले आहेतच. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री जयशंकर, विनोद तावडे आदी नेत्यांनी पहिल्या फेरीत पुणेकरांशी संवाद साधला होता. पुण्याची जागा ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची आणि मोहोळ हे त्यांचे निकटवर्ती असल्याने फडणवीस यांनी पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले होतेच. मोदींच्या सभेमुळे मोहळ यांचा विजय निश्चितच असे महायुती समजत आहेच.

दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची प्रचारशैली. सत्ताहीनता आणि पक्षातील स्थानिक नेत्यांमधील बेबनाव यामुळे लया गेलेल्या पुण्यातील काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाले, ते धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत एकहाती मिळवून दिलेल्या विजयाने. रस्त्यावरचा, जनतेमधला कार्यकर्ता या त्यांच्या प्रतिमेने कसब्यात काँग्रेसला यश मिळाल्याने पक्षाला नवसंजीवनी आली. त्यामुळेच आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर वर्षाच्या आतच त्यांना खासदारकीच्या तिकिटासाठी पक्षाने निवडले. पक्षाची पारंपारिक प्रचारयंत्रणा कशी काम करते आहे, त्याकडे लक्ष न देता धंगेकर यांनी स्वतःची यंत्रणा लावून प्रचार सुरू केला. प्रचारफेऱ्यांमध्ये घरोघरी भेटी देण्यावर ते भर दिला होता, या वैयक्तिक भेटींचे रूपांतर मतांमध्ये निश्चित होईल असे त्यांना वाटते. त्यांच्यासाठी पुण्यात राहुल गांधी यांची सभा देखील झाली. एम आय एम पक्ष्याच्या उमेदवारामुळे आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्यामुळे काँग्रेसचे पारंपारिक दलित आणि मुस्लीम मते विभागून मुरलीधर मोहळ यांना फायदा होईल असे जाणकारांचे मत आहे. loksabha election 2024 निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles