खा. धनंजय महाडीकांचा कन्नड संघटनांना दम| Maharashtra and Karnataka Border Dispute

कोल्हापूर :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा (Maharashtra and Karnataka Border Dispute) पेट घेत आहे. महाराष्ट्राचे अविभाज्य अंग असणार्‍या बेळगावसह जत, अक्कलकोट आदी भागांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केला असून याबाबत दोन्ही राज्यातील नेत्यांच्याकडून टीका- टिपणी होत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या भडकावू वक्तव्यानंतर आज बेळगावजवळ कन्नड संघटनांनी उच्छाद मांडला. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळत आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडीक यांनी “महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्न(Maharashtra and Karnataka Border Dispute) ज्ञायालयात प्रलंबित असताना मुख्यमंत्री यांच्या भडकावू विधानानंतर महाराष्ट्रीय गाड्यांची तोडफोफ होत आहे. असे भ्याड हल्ले करणार्‍यांनी लक्षात ठेवावे की भारतात कुठेही जायचे असले तरी महाराष्ट्रातूनच जावे लागते. अन्यथा परिणाम वाईट होतील,” अशा प्रखड शब्दात दम भरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here