Maharashtra HSC Result LIVE | बारावी बोर्डाचा निकाल 91.25 टक्के | कोकण विभाग नंबर वन

0 5

- Advertisement -

Maharashtra HSC Result LIVE राज्य मंडळाचा बारावीचा निकाल लागला आहे. राज्यात एकूण 14,16,371 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे राज्याचा निकाल 91.25 टक्के आहे. विद्यार्थ्यांना आज दुपारी २ वाजता बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. तसेच कोकण विभाग अव्वल ठरला आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली.

हा निकाल मागील वर्षापेक्षा कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल 2.97 टक्क्यांनी घटला आहे. कॉपीमुक्त अभियानाचा हा परिणाम आहे आस मत व्यक्त केल आहे. Maharashtra HSC Result LIVE

सर्व विभागीय मंडळातून 93.73 टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून 89.14 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 4.59 टक्क्यांनी जास्त आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर mahresult.nic.in जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी विद्यार्थ्यांनी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करणं अपेक्षित असेल. 

मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 81 टक्के लागला आहे.

विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी

विभागीय : उत्तीर्णतेची टक्केवारी

- Advertisement -

पुणे : 93.34 टक्के

नागपूर : 90.35 टक्के

औरंगाबाद : 91.85 टक्के

मुंबई : 88.13 टक्के

कोल्हापूर : 93.28 टक्के

अमरावती : 92.75 टक्के

नाशिक : 91.66 टक्के

लातूर : 90.37 टक्के

कोकण : 96.01 टक्के

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.