Monday, September 16, 2024

महाविकास आघाडी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करत आहे ; देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue) काही दिवसांपूर्वी कोसळला आणि महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले. याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून मुंबईत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हुतात्मा चौक येथून सुरुवात झाली आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)  तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सहभागी झाले आहेत. या मोर्चास गेट वे ऑफ इंडिया येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज हे संबोधित करणार आहेत. दरम्यान या आंदोलनावरून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले कि : ‘हे पूर्ण राजकीय आंदोलन आहे. त्यांनी महाविकास आघाडीला एक सवाल केला की महाविकासआघाडीने  लाल किल्ल्याहून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं असे इंदिरा गांधी यांचं एक तरी भाषण दाखवाव, पंडित नेहरू यांनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का? इतके वर्ष काँग्रेसने महाराजांनी सुरत लुटली असा इतिहास शिकवला, शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटली नव्हती, मात्र जाणीवपूर्वक आम्हाला इतिहास शिकवण्यात आला त्याबद्दल ते माफी मागणार का?

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथ यांच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजरने हटवण्याच पाप काँग्रेसने केलं महाविकास आघाडी त्याची माफी मागणार का? कर्नाटकमध्येही तेच घडलं. महाविकास आघाडी ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आंदोलन करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles