यंदा पहिल्यांदाच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मराठ्यांचा दसरा मेळावा बीड जवळील नारायण गडावर होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे.या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झाले आहे. विशेष म्हणजे या मेळावा तब्बल 900 एकरवर होणार आहे यासाठी येणाऱ्या गाड्यांचे 200 एकरवर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्व लोकांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे ऑक्टोबर महिन्यातील हिट लक्षात घेता पाण्याची व्यवस्था ही मुबलक करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील पहिल्या दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलतील सध्याचे राजकारण किंवा आपली राजकीय भूमिका मांडतील का,जवळच असणारा पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मेळाव्या बद्दल ते काय बोलतात,आरक्षणाची चळवळ पुढे कशी सुरु ठेवणार या सर्व प्रश्नावर जरांगे काय भूमिका मांडतात याकडे सर्व मराठा बांधवांचे लक्ष लागले आहे त्यामुळे राज्यभरातून मराठा बांधव या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
200 एकरवर पार्किंग १०० रुग्णवाहिका कार्यरत:
नारायण गडावर होणारी गर्दी लक्षात घेऊन आरोग्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. येथे येणाऱ्या बांधवांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळणार आहे. याठिकाणी 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका कार्यरत असणार आहेत. तब्बल 200 एकरवर पार्किंकची व्यवस्था असणार आहे. 10 वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहेत ज्या सुविधा आय सी यु विभागात दिल्या जातात त्याच सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत.
या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नारायणगडावर जवळपास 500 क्विंटल बुंदीचे गाळप महाप्रसाद स्वरूपात करण्यात आले आहे. दिवस-रात्र मराठा बांधवांसाठी मराठा सेवकांचे हात येथे झटत आहेत. जेवणासह महाप्रसाद म्हणून बुंदी तयार केली जातेय.