कोल्हापूर मध्ये चंद्रकांतदादांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला

Live Janmat

भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने जिजाऊ फौंडेशन च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

आज सन्मानीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ फाउंडेशन यांच्या वतीने अविरतपणे चालू असलेली जिजाऊ थाळी मार्फत पाचशे लोकांना श्रीखंड पुरी चे जेवण वाटप करण्यात आले. तसेच 51 महिलांना दोन महिने पुरेल इतका राशन देण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन तोडकर, जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा धनश्री सचिन तोडकर व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने विधायक स्वरूपात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस उत्साहात करण्यात आला.

यावेळी उमेश साळुंखे, भास्कर पाटील, अभिजीत सूर्यवंशी, सागर गिरी, जे हेरंब तळेकर, पिंटू बामणे, जयश्री वायचळ, संपा सानप, सरस्वती थोरवत व विविध मान्यवर उपस्थित होते.

[webinsights_author_box]

LATEST Post