पोर्ले ते यवलूज रस्ता मोजणी करून करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा): गेल्या दोन वर्षांपासून वादात अडकलेल्या पोर्ले ते यवलूज या मंजूर रस्त्याच्या शासकीय मोजणीसाठी अखेर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय विभागाला आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे वादग्रस्त रस्ता आता मोजणी करूनच होणार आहे. त्यामुळे प्रलंबित रस्ता आता लवकच होणार आहे.

सदर रस्ता हा वर्षानुवर्षे वापरात असूनही त्याचे अधिकृत सीमांकन झालेले नव्हते, त्यामुळे रस्त्याच्या मार्गावरून शेतजमिनींबाबत अनेक शेकऱ्यांचे वाद निर्माण झाले होते. शेतकऱ्यांकडून सातत्याने प्रशासनाकडे मागणी केली जात होती की सदर मंजूर रस्त्याची नकाशानुसार मोजणी करून रस्ता खुला करण्यात यावा. महायुती सरकारने ही काही महिन्यापूर्वी अश्या वादग्रस्त रस्ते/पाणंद रस्त्यासंदर्भात GR काढून प्रशासनाला विशेष मोहीम राबवून रस्ते खुले करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पोर्ले तर्फ ठाणे मार्फत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची त्वरित दखल घेत जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख कोल्हापूर विभागाला शासकीय मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष मोजणी होणार असल्याचे समजते.

या निर्णयामुळे –

  • शेतकऱ्यांचे शेतमार्ग स्पष्ट होतील
  • वादग्रस्त परिस्थितीला पूर्णविराम मिळेल
  • रस्त्याच्या दुरुस्ती व विकास कामांना चालना मिळेल

ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत असून “हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून लवकरच रस्ता पूर्ण होणार आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com