निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे ( samadhan autade bjp ) यांनी बाजी मारली.
भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची भाजपची बाजी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव
मा. @Dev_Fadnavis साहेबांच्या नेतृत्वात पंढरपुरात विठू माऊलींनी आणि जनतेने समाधान आवताडे जी यांना आशीर्वाद दिले. हा भाजपच्या विकासात्मक विचारांचा विजय असून,सहानुभूतीची लाट तसेच आघाडीतील तिन्ही पक्षाच्या एकत्रित उमेदवाराला पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेने नाकारले. #करेक्ट_कार्यक्रम pic.twitter.com/FsAVnZ5rMX
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 2, 2021
महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha result) भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade win) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke ncp) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली.
जनतेच्या आशिर्वादाच्या बळावर ३ पक्षांच्या सत्ताधारी आघाडीला पराभूत करत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री समाधानजी औताडे यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. उमेदवार श्री समाधानजी, भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक अभिनंदन.#पंढरपुर
— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) May 2, 2021
1/2 pic.twitter.com/vDIX7O5SFl