मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर राहुल चिकोडे यांनी महापालीकेला धारेवर धरल

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे २१ वर्षीय तरुणीचा जीव गेला. वारंवार सांगूनही महानगरपालिक मोकाट कुत्र्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नाही. आम्ही वारंवार निवेदने, निदर्शने करून देखील याविषयात महापालिकेचे अधिकारी निर्ढावलेले आहेत. दररोज दोनशे व्यक्तींना भटक्या कुत्र्यांचा चावा होतो अशी नोंद असताना देखील याविषयात निष्क्रिय कारभार आरोग्य विभागाकडून होत आहे. डॉग स्कॉड, निर्बीजीकर, शस्त्रक्रियेसाठी पुरसे डॉक्टर नसणे अशी अवस्था महापालिका आरोग्य विभागाची असून या विषयात आरोग्य अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राहूल चिकोडे यांनी उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे केली.

संवेदनशील असणारा हा विषय मात्र महापालिका प्रशासन गांभीर्याने घेतला नसल्याने अखेल काल महापालिका परिसराच्या ३०० मिटर अंतरावरील राहणा-या २१ वर्षाच्या श्रुष्टी शिंदे या युवतीला आपला हाकनाक जीव गमवावा लागला.

राहुल चिकोडे यांनी गेली अनेक महिन्यांपासून कोल्हापुरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न लावून धरला आहे. वारंवार महापालीकेला तक्रार देवूनही सातत्याने दुर्लक्ष केल जात आहे. आज चिकोडे यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्याना धारेवर धरले होते.

महापालिका प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वर पाय, निलंबित करा निलंबित करा आरोग्य अधिकारी निलंबित करा, भ्रष्ट आरोग्य अधिका-यांचा धिक्कार असो, महापालिका आरोग्य विभागाचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यानंतर महापालिकेच्या दारात आपला निषेध नोंदवत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार ढकलून देत जोरदार घोषणाबाजी करत आयुक्त केबीन कडे धाव घेतली यानंतर आयुक्तांच्या केबिनच्या दारामध्ये बसून निष्क्रिय आयुक्तांच धिक्कार असो अशा घोषणा देत सर्वांनी आयुक्तांचा तीव्र भाषेत निषेध नोंदवला. यानंतर उपायुक्त रविकांत आडसूळ, आरोग्य अधिकारी विजय पाटील यांना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेराव घालत घडलेल्या घटनेबद्दल प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले. आक्रमक झालेल्या पदाधिका-यांच्या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर ठरले. यावेळी अशोक देसाई, गायत्री राउत, शैलेश पाटील, योगेश कांटरानी यांनी घडलेल्या घटनेबाबद्दल तीव्र शब्दात आयुक्त आणि आरोग्य प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला. भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, मागील वर्षभरात जिल्ह्यामध्ये ७२ हजार व्यक्तींना तर शहरात एका महिन्यात ७ हजार व्यक्तींना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून या विषयातील गांभीर्य अधिकाऱ्यांच्या डोळ्यांना दिसत नाही का ? संबंधित घटनेमध्ये एकूण ३० व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतला असून आपली जबाबदारी म्हणून आरोग्य अधिका-यांनी उर्वरित २९ व्यक्तींचा शोध, साधी चौकशी देखील केली नाही. निर्बीजीकरण याविषयात मिळणारा निधी, महिन्याला होणारे निर्बीजीकर याची माहिती घेत दोन वर्षात निर्बीजीकर होणे अपेक्षित असतान अद्यापही भटक्या कुत्र्यांची संख्या का नियंत्रणात येत नाही असा सवाल केला. त्यामुळे आपल्या निष्क्रिय कारभारातून एका निष्पाप मुलीचा जीव घेणाऱ्या महापालिका प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सदर विषयात ठोस कार्यवाही झाली नाही तर भाजपा आक्रमक आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा यावेळी दिला.

यानंतर उपायुक्त रविकांत आडसूळ, आरोग्य अधिकारी विजय पाटील या विषयात निरुत्तर ठरले. त्याचबरोबर महापालिका आयुक्त देखील उपस्थित न राहिल्याने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक देसाई, राजू मोरे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, चिटणीस अतुल चव्हाण, रोहित पवार, संगीता खाडे, किरण नकाते, राजसिंह शेळके, मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी, विशाल शिराळकर, संदीप कुंभार, अनिल कामत, आजम जमादार, सयाजी आळवेकर, अशोक लोहार, हर्षद कुंभोजकर, सतीश अंबर्डेकर, नरेंद्र पाटील, अमित पसारे, किसन खोत, संतोष जाधव, प्रसाद पाटोळे, पारस पलीचा, प्रीतम यादव, सचिन सुतार, लालासो पवार, विजय शिंदे, सुधीर बोलावे, सुनील पाटील, रविकिरण गवळी, धीरज पाटील, प्रताप देसाई, छाया साळुंखे, मानसिंग पाटील, हर्शांक हरळीकर, किशोर लाड, संतोष डोंगरकर, प्रशांत पाटील, सुशीला पाटील, रेखा पाटील, कोमल देसाई, पद्मजा गुहाघरकर इ. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com