कोल्हापूर : येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक (Rajaram Election 2023) अंतिम टप्यात आली असून दोन्ही गटाकडून जोर लावला जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात विविध प्रश्न उपस्थित करून विरोधी गटाने लक्ष केंद्रित करून घेतले होते परंतू महाडिक गटाने पलटवार केल्याने चित्र पूर्णता बदलून गेले आहे. यात डॉ. विनय कोरे यांच्या एंट्रीने विरोधी गटाची समीकरणे बिघडली असल्याचे चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
राजाराम सहकारी साखर कारखान्यावर महाडिक कुटुंबियांची गेली २८ वर्षे निर्विवाद सत्ता राहिले असून याला आवाहन बंटी पाटील यांनी दिले होते. परंतू डॉ. विनय कोरे यांच्या उघड भूमिकेने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीचा प्रचार (Rajaram Election 2023) शिगेला पोहचला असताना आमदार विनय कोरे यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. विधानपरिषदेची निवडणुक बिनविरोध करण्यात आमदार विनय कोरे यांचा सिंहाचा वाटा होता. “या निवडणुकीच्या वेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, उद्योगपती संजय पाटील यांनी आमदार विनय कोरेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांनी कोरे यांच्या विनंतीस मान ठेवून विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध केली होती. परंतू दिलेला शब्द बंटी पाटील यांनी पाळला नाही त्यामुळे मी जाहीरपणे महाडिक गटाला पाठिंबा देत आहे.” असा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार डॉ. विनय कोरे यांनी कुंभोजच्या सभेत केला. कोरे यांच्या पाठिंब्याने सत्ताधारी गट अधिक मजबूत झाला असून सत्ताधारी गटाचा विजय निश्चित मानला जात आहे.चर्चेला उधाण, अमल महाडिकांनी मारले मैदान!
आमदार डॉ. विनय कोरे यांचा पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, हातकणगले या तालुक्यात जनसुराज्य पक्षबांधणी मजबूत असून कोरे यांनी सर्व ताकदीने निवडणुकीत उतरण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्याना दिले असून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या टेंशनमध्ये वाढ झाली असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे विरोधी गटाचा दारुण पराभव होण्याची शक्यता तज्ञ वर्तवत आहेत.Rajaram Election 2023 बंटी पाटील यांनी शब्द मोडायला नको होता – आम. डॉ. विनय कोरे