Wednesday, November 20, 2024

Rajaram karkhana | चंद्रदीप नरकेंच मौन ; बंटी पाटीलांची डोकेदुखी ?

- Advertisement -

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या Rajaram karkhana निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या कुंभी साखर कारखान्याच्या निवडणुकीने राजकीय समीकरणे बदलली होती. त्यामुळे राजाराम कारखान्याच्या अनुषंगाने विविध चर्चा सुरू होत्या. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत चित्र मात्र काहीसे वेगळे दिसत आहे.

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदानास अवघे काही तास शिल्लक राहिले असताना कुंभीतील बंटी पाटील यांच्या सक्रिय सहभागाने राजारामच्या निवडणुकीत चंद्रदीप नरके दिसतील अशी चर्चा बंटी पाटील गटात होती. परंतु सध्या जिल्ह्यातील मात्तब्बर सर्वपक्षीय नेते महाडीक गटाला पाठिंबा देत आहेत, तथा पर्यायी बंटी पाटील यांची सर्व राजकीय समीकरणे फोल ठरत आहेत का? यापाठीमागे माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे मौन देखील कारणीभूत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते.

Rajaram Election | कोरेंच्या एंट्रीने, बंटी पाटलांचे टेंशन वाढले

आमदार बंटी पाटील यांनी आपल्याच पक्षातील व मित्रपक्षातील नेत्यांच्या विरोधात दंड थोपटून चंद्रदीप नरके यांना मदत केली होती. कुंभीच्या निवडणुकीतून राजारामसाठी जुळवाजुळव सुरू केली होती. पश्चिम पन्हाळा व करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांना मानणारा मोठा गट आहे. याचा फायदा राजारामच्या निवडणुकीत होणे, असे अपेक्षित असणे साहजिकच आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता चंद्रदीप नरके हे प्रचारात कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे बंटी पाटील गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. Rajaram karkhana

माजी आमदार नरके यांच्या तटस्थेच्या भूमिकेने बंटी पाटील यांची राजकीय बेरजेची गणिते मात्र पुरती बिघडली आहेत का? हे राजाराम कारखान्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. Rajaram karkhana

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles