Monday, September 9, 2024

sambhaji raje | संभाजीराजेंकडून लोकसभा निवडणुक लढविण्याचे संकेत

- Advertisement -

जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येवू लागली आहे तसशी अनेक आजी-माजी खासदार निवडणूक लढवण्याच्या जागंबाबत दावे-प्रतिदावे करू लागले आहेत. आज कोल्हापूर मध्ये माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. संभाजीराजे sambhaji raje यांनी बोलताना स्वराज्य संघटना लोकसभा निवडणुकीत मुख्य प्रवाहात असल्याचा दावा केला. 2009 मध्ये झालेली जखम अजूनही विसरलेलो नाही असेही त्यांनी म्हंटले आहे.

जुन्या जखमा आम्ही अजूनही विसरलो नाही

माजी खासदार संभाजीराजे sambhaji raje यांनी लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना सांगितले की, येत्या निवडणुकीत स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात राहणारआहे. मात्र आम्ही अजून किती जागा लढवणार याबाबत अजून स्पष्टता नाही. आमच्यावर 2009 मध्ये झालेल्या जुन्या जखमा आम्ही अजूनही विसरलो नाही. आमच्यावर कोणीही वार करू शकत नाही. स्वराज्यबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, त्यामुळे संभाजीराजे लढणार की नाही लढणार हे वेळच ठरवेल. 

कोल्हापूर, नाशिक की संभाजीनगर..

दरम्यान संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना लोकसभेबाबत मोठ वक्तव्ये केले आहे. कोल्हापूर, नाशिक की संभाजीनगर हा निर्णय सुद्धा वेळ ठरवेल असे सुद्धा त्यांनी सांगितले. त्याचबरोबर चर्चेसाठी सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचे ते म्हणाले. जे कोणी जास्त प्रेम देतील तिथे संभाजीराजे उभारणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे लोकसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची घोषणा एक प्रकारे संभाजीराजे यांनी करून टाकली आहे. 

‘या’ मतदारसंघातून स्वाभिमानी संघटना लढविणार लाेकसभेच्या सहा जागा | Raju shetti

याआधी २००९ संभाजीराजे यांनी कोल्हापूर लोकसभा राष्ट्रवादीच्या चिन्हवर लढविली होती. त्यावेळी त्यांचा पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर घेवून खासदार केले होते.

२००९: कोल्हापूर लोकसभा
अपक्षसदाशिवराव मंडलिक४,२८,०८२४१.६५
राष्ट्रवादीछत्रपती संभाजीराजे शाहु३,८३,२८२३७.२९
wikipedia

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles