संजय राऊत म्हणजे मविआची गौतमी पाटील – नितेश राणे | Gautami Patil

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. नितेश राणेंनी संजय राऊत महाविकास आघाडीची गौतमी पाटील Gautami Patil असल्याचं म्हणत टीका केली. तसेच राऊतांना हे नेमके कुणाच्या बाजूने आहेत हेही समजत नाही. सरड्यालाही लाज वाटेल इतके ते रंग बदलतात, असा हल्लाबोल केला.

जाणून घ्या राजदंडाचे कोल्हापूर कनेक्शन | Sengol

गौतमी पाटील वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांचं मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते. ती उत्तम कलाकार आहे. तिला पाहायला लोकांना आवडतं. तसंच या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला Gautami Patil वाटतं की, लोकांना त्याला पाहायला आवडतं. तो गैरसमज दूर झाला पाहिजे अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

नीतेश राणे यांच्या टिकेनंतर रूपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिले, ” गौतमी पाटील हे पोटासाठी नृत्य करते, यामध्ये काहीच चुकीचे नसून अशाप्रकारे महिलांचा अनादर केला जाऊ नये. याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात असे असभ्यतेचे वर्तन करणाऱ्या राणे यांना समज द्यावी असेही त्या म्हणाल्या. अशा प्रकारची बेताल वक्तव्ये यांनी महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक वातावरण कलुषित होते. Gautami Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here