Saturday, May 27, 2023
No menu items!
Homeशिक्षणसोनू सूद स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देणार, या प्रकारे अर्ज करता येणार

सोनू सूद स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देणार, या प्रकारे अर्ज करता येणार

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना मोफत प्रशिक्षण देण्याची घोषणा केलीय. यासाठी एक शिष्यवृत्ती योजना लाँच करण्यात आलीय. सोनू सूदने स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. या योजनेचं नाव ‘संभवम’ (Sambhavam) असं आहे. (Sonu Sood will provide free training for the competitive examination, thus applying)

सोनू सूदने शुक्रवारी (11 जून) याबाबत ट्विट केलं. यात त्याने म्हटलं, “तुम्हाला भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) जायचं असेल तर आम्ही तुमची जबाबदारी घेऊ. यासाठी सूद फाऊंडेशन आणि दिया फाऊंडेशनचा संभवम उपक्रम सुरू करताना मला खूप आनंद होतो आहे.” सोनू सूदने ट्विटरवर एक पोस्टरही शेअर केलंय. त्यात संभवम उपक्रमात काय मदत केली जाणार आहे याची माहिती आहे. यानुसार, येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मोफत प्रशिक्षण, उत्तम मार्गदर्शकांची उपलब्धता आणि व्यक्तिमत्व विकासासाठी काम केलं जाणार आहे.

अर्ज कसा कराल?

सोनू सूदने सुरू केलेल्या या उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी संबंधितांना यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज सोनू सूद फाऊंडेशनची अधिकृत वेबसाईट http://www.soodcharityfoundation.org/  येथे करता येईल.

मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख

इच्छिक तरुणांना तातडीने यासाठी अर्ज करावा लागेल. कारण यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे. त्यामुळे याआधीच इच्छूकांनी अर्ज करण्याचं आवाहन सूद फाऊंडेशनकडून करण्यात आलंय.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular