राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार: अमित शहा  

- Advertisement -

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या तयारीत जोरदार हालचाली सुरु आहेत. भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात कोल्हापूर या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शहा यांनी विधानसभेत पश्चिम महाराष्ट्र जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

यावेळी अमित शहा (Amit Shaha) म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार असून, यानंतर भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष बनेल. कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकून कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु या निवडणुकीनंतर तो भाजपचा बालेकिल्ला बनेल, यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पराभूत करणे आवश्यक आहे, असे शहा म्हणाले. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नैराश्य सोडून विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा : अमित शहा

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी भाजप हा सलग तीन वेळा सत्ता मिळवलेला पक्ष आहे, असे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या काँग्रेसने गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या जागांपेक्षा यंदा भाजपने अधिक जागा मिळवलेल्या असल्याचे कार्यकर्त्यांना त्यांनी स्मरण करून दिले.पुढे बोलताना ते म्हणाले, विरोधकांनी संविधानाबाबत केलेला खोटा प्रचार आता जनतेला समजला आहे. त्यामुळे जनतेमध्ये सकारात्मक बदल झाला आहे. काँग्रेसला कमी जागा मिळूनही राहुल गांधी विजयी झाल्याचा अनुभव घेत आहेत, मग आपण सत्ता मिळवून निराश का? त्यामुळे आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा असे आव्हान केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles