राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 20 उमेदवारांची यादी निश्चित |

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका  येत्या काही दिवसात जाहीर होवू शकतात. महाविकास आणि महायुतीकडून पक्षाची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. येणारी आगामी  निवडणुक ही महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी आहे. महायुतीचे सध्या अजूनही जागावाटप जाहीर झाले नसताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पक्षाचे 20 संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार गटाची नुकतीच पक्ष बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या 20 संभाव्य उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या उमेदवारांची नावे समोर आली आहेत. या 20 नावांमध्ये वरिष्ठ नेते आणि सध्या मंत्रिमंडळातील बऱ्याच लोकांचा समावेश आहे सर्व अजित दादांचे जवळचे मानले जातात यातून एक प्रश्नही निर्माण होतो तो म्हणजे जे अजित दादांसोबत आहेत पण नाव निश्चित नाही त्यांची उमेदवारी टांगणीला लागली आहे त्याचं पुढ काय होणार.

अजित पवार गटाच्या 20 उमेदवारांची नावे:

  1. बारामती विधानसभा  – अजित पवार
  2. आंबेगाव विधानसभा – दिलीप वळसे-पाटील
  3. कागल विधानसभा – हसन मुश्रीफ
  4. परळी विधानसभा – धनंजय मुंडे
  5. वडगाव-शेरी – सुनील टिंगरे
  6. येवला विधानसभा – छगन भुजबळ
  7. दिंडोरी विधानसभा – नरहरी झिरवळ
  8. रायगड विधानसभा – अदिती तटकरे
  9. अहमदनगर विधानसभा – संग्राम जगताप
  10. खेड विधानसभा – दिलीप मोहिते-पाटील
  11. अहेरी विधानसभा – धर्मरावबाबा आत्राम
  12. कळवण विधानसभा – नितीन पवार
  13. इंदापूर विधानसभा – दत्ता भरणे
  14. उदगीर विधानसभा – संजय बनसोडेट
  15. पुसद विधानसभा – इंद्रनील नाईक
  16. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा – मकरंद आबा पाटील
  17. मावळ विधानसभा – सुनील शेळके
  18. पिंपरी विधानसभा – अण्णा बनसोडे
  19. अमळनेर विधानसभा- अनिल पाटील
  20. जुन्नर विधानसभा– अतुल बेनके
vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com