कोल्हापूर : श्री.नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करून राज्यात महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतदार सज्ज झाले आहेत. देशात गेल्या दहा वर्षात पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी केलेले विकासाचे काम, तत्कालीन मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील विकास काम आणि सध्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्यात झालेले विकासाचे, जनहिताचे काम पाहता जनता महायुतीच्या पाठीशी ठाम उभी आहे.
गेल्या अडीच वर्षात कोल्हापूरच्या ढाण्या वाघाने सुमारे ४५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कोल्हापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरु केले आहे. नियोजनात्मक प्रचारातून विकास कामाची शिदोरी घेवून मतदारांपर्यंत पोहचणार असून, उत्तरची जनता महायुतीच्या बाजूने असल्याने राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदिल फरास यांनी केले.
महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ गंगावेश – दुधाळी – रंकाळा टॉवर परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अपवाद वगळता कोल्हापूर शहरानेही कायमच शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार शिवसेनेच्या भगव्याला साथ दिली आहे. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचे देशातील विकासाचे काम, तर मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे राज्यातील जनहिताचे काम हेच आमच्या प्रचाराचे मुख्य अस्त्र असणार आहे. या कामाची शिदोरी घेवून मतदारांपर्यंत जात आहेत. विरोधकांकडे टिकेशिवाय इतर कोणताही मार्ग नाही पण या टीकेला आम्ही कामाने उत्तर देवू. आमच्या कामाच्या बळावर आम्ही निवडणूक लढविण्यास सज्ज असून, शहरवासियांनी भरघोस मताधिक्यांनी विजयी करावे, असे प्रतिपादन केले.
यावेळी किशोर घाटगे, सचिन बिरंजे, अप्पा घरपणकर,धनाजी कारंडे,विराज चिखलीकर,राजू कदम,राहुल जनवेकर, अरुण अथने,किरण मांगुरे,राजेंद्र चव्हाण, विश्वजीत चव्हाण, अभि कदम,अशोक राबडे, रियाज बागवान,ब्रम्हानंद वडणगेकर ,अक्षय बोडके,अजित कारंडे,वैभव मोरे,दीपक काटकर,कपिल केसरकर,पृथ्वीराज मोरे,अमोल गायकवाड,रमेश साळोखे,प्रतीक साळोखे, आदी भागातील नागरिक महायुती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.