कोल्हापूर : गेल्या काही दशकांमध्ये हिंदू धर्मीयांच्या अस्मितेशी खेळण्याचे ठराविक घटकांद्वारे सातत्याने यशस्वी प्रयत्न होत आहेत. परंतु समाजात याबाबत जागरूकता म्हणावी अशी होत नव्हती, म्हणून सातात्याने जागरूक हिंदू समाजातील एक घटक याला विरोध करत होते. अन ती भावना जनमाणसांची प्रबळ इच्छा बनली आहे. यातूनच समस्त हिंदू समाजाने हिंदू जनआक्रोश मोर्चा चे नियोजन 01 जानेवारी रोजी केले आहे.
गेल्या दोन तीन महिन्यात लव्ह जिहाद मधून केलेल्या बर्याच हत्यांचे विदारक चित्र समोर आले आहे. दिवसेंदिवस असे प्रकार वाढतच आहेत. तसेच गरीब हिंदूंना भूलथापांना बळी पाडून त्यांचे धर्मांतर घडवून आणले जाते आहेत. हिंदू धर्मात प्रवित्र असणार्या गायींची हत्या होत आहेत. यामुळे समस्त हिंदू धर्मियांच्या अस्मिता दुखावल्या आहेत. तरी या मोर्च्यामधून लव जिहाद, धर्मांतर व गोवंशहत्या विरोधात विराट मोर्च्याचे आयोजन करण्यात आले असून सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात येणार आहे. कोल्हापूरातून सुरुवात होणार्या मोर्चाची दखल सरकारला घ्यावीच लागते. हा आजवरचा इतिहास आहे, त्यामुळे समस्त हिंदूं मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होतील.
हिंदू जनआक्रोश मोर्च्याचा मार्ग:- बिंदू चौक- मिरजकर तिकटी- बिंनखांबी गणेश मंदिर- पापाची तिकटी- महानगरपालिका- शिवतीर्थ- भवानी मंडप
- कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी 115 कोटी रुपये
- Maharashtra Budget 2023 |श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण 50 कोटी रुपये
- Maharashtra Budget 2023 | शेतकऱ्याच्या खात्यात थेट जमा होणार 12 हजार रुपये | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- Maharashtra Budget 2023 | महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
- …अन्यथा आयोगाविरोधात कोर्ट मध्ये जावू- देवेंद्र फडणवीस