Sunday, July 14, 2024

‘या’ निर्णयाने सतेज पाटील यांची राजकीय प्रतिमा डागाळली..? | rajaram karkhana kolhapur

- Advertisement -

राजाराम सहकारी साखर कारखाना rajaram karkhana kolhapur निवडणुकीत आमदार विनय कोरे यांनी विधान परिषद निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी राजाराम बिनविरोध देण्याचा शब्द दिला होता असा गौप्यस्फोट केल्याने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. कोरे सावकर व बंटी पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे.

rajaram karkhana kolhapur 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बंटी पाटील यांना विधान परिषदेत निवडूण आणण्यात सावकरांचा मोठा सहभाग होता. अगदी देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असतानाही त्यांनी बंटी पाटील यांनाच मदत केली होती. २०१६ विधानपरिषद निवडणुकीत झालेला घोडेबाजार पाहता गतवर्षी झालेल्या निवडणुकीत मध्यस्थी करत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सावकरांनी पुढाकार घेतला होता. त्याचवेळी सावकर यांनी राजाराम कारखाना महाडिक यांना बिनविरोध देण्याचा शब्द बंटी पाटलांकडून घेतला होता. विरोधात पॅनल देत बंटी पाटील यांच्याकडून दिलेल्या शब्दाला हरताळ फासण्याचे काम झाले आहे अशी चर्चा लोकांच्यामध्ये रंगली आहे.

बंटी पाटील यांनी शब्द मोडायला नको होता – आम. डॉ. विनय कोरे

Rajaram karkhana | चंद्रदीप नरकेंच मौन ; बंटी पाटीलांची डोकेदुखी ?

2014 च्या पराभवानंतर बंटी पाटील यांनी राजकीय मित्र कोरे यांच्या मदतीने जिल्ह्यातील महत्त्वांच्या निवडणुकात यश मिळवले. त्यातच अलीकडच्या काळात काँग्रेस प्रदेश पातळीवर जबाबदारी मिळावी यासाठी बंटी पाटील सक्रिय आहेत. एकदा शब्द दिला की दिला तो पाळणारच अशी स्वतःची राजकीय प्रतिमा बनवण्यात यश मिळतंय अस वाटतं असतानाच सावकरांनी केलेल्या खुलाशामुळे बंटी पाटील हे अडचणीत आलेत. त्यात सावकर हे आरोप प्रत्यारोपापासून नेहमी दोन हात लांब राहणारे नेते. त्यांची स्वतःची एक वेगळीच विश्वासार्हता आहे त्यामुळं अडचणीच्या काळात मदत केलेल्या सावकारांनाच तोंड घशी पाडून बंटी यांनी गरज नसताना विरोधक तयार केला आहे. rajaram karkhana kolhapur

आता बंटी समर्थक सावकर यांना खोटं ठरवू पहात आहेत. मात्र सावकर यांची राजकीय कारकिर्द ही विश्वासार्हतेवर आधारित आहे. त्यामुळं या राजारामच्या निवडणुकीमुळे बंटी पाटील यांनी मोठ्या कष्टाने बनवण्याचा प्रयत्न केलेली राजकीय प्रतिमा डागळण्यास सुरुवात झाली आहे अशी चर्चा कोल्हापुरात चालू आहे. या निर्णयाचा त्यांना भविष्यातील राजकारणात मोठा फटका देखील बसू शकतो का ? हे आता येणारी वेळच ठरवेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles