Wednesday, May 22, 2024

kolhapur| ते समर्थक नावालाच बंटी सोबत, आतून मात्र आपल्यालाच मतदान करणार – सुनिल कदम

- Advertisement -

kolhapur शेतकऱ्यांचा तोडणी झालेला ऊस शेतात वाळून जाईपर्यंत गाळपास न घेऊन जाणाऱ्या बंटी पाटलांना राजाराम बद्दल बोलायचा अधिकारच नाही अशी जहरी टीका माजी महापौर सुनिल कदम यांनी कळंबा येथील प्रचारसभेत केली. जनसुराज्यचे नेते विनय कोरे यांच्या भाषणाचा संदर्भ घेत कदम यांनी बंटी पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. बंटी पाटील हा संधी साधू, लबाड माणूस आहे. डी वाय पाटील कारखान्याला जाणारा शेतकऱ्यांचा ऊस तोडणी नंतर लगेच गाळपास न जाता तो दोन दिवस उशिरा का जातो असा प्रश्न कदम यांनी विचारला.

‘या’ निर्णयाने सतेज पाटील यांची राजकीय प्रतिमा डागाळली..? | rajaram karkhana kolhapur

यावेळी कदम यांनी उदाहरणादाखल बंटी पाटील यांच्या समर्थकाचे नाव आणि घडलेली परिस्थिती सांगितली. हे फक्त एक उदाहरण नाही तर बंटी यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला भोगावी लागणारी परिस्थिती आहे. त्यामुळे बंटींचे समर्थक हे फक्त नावालाच त्यांच्यासोबत आहेत मात्र आतून ते आपल्यालाच मतदान करणार असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

संजय पाटील यांनी शेतकऱ्यांचा ऊस खाजगी कंपनीच्या नावावर घालवत शेतकऱ्यांना त्यांच्या साखरे पासून वंचित ठेवण्याचे पाप केलं आहे असा गंभीर आरोप कदम यांनी केला. विनय कोरे यांनी केलेल्या खुलाशावर देखील त्यांनी त्यांचे मत व्यक्त केलं. कोरेंनी सांगितली ती वस्तुस्थिती असून बंटी पाटील हे संधी साधू आहेत. जिल्ह्यातील अनेक नेत्यांचा बंटींनी वापर करून स्वतःचे हित साधले आहे मात्र आता सर्वच नेत्यांनी त्यांना पुरती ओळखले आहे. यापुढे बंटींना त्यांची योग्य ती जागा दाखवली जाईल असेही कदम म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles