पोर्ले तर्फ ठाणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ.वनिता तानाजी भोपळे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच अनुराधा पाटील यांनी रोटेशननुसार आपला कार्यकाळ संपताच राजीनामा दिलेला होता. त्यामुळे नूतन सरपंच निवडीसाठी बैठकीचे आयोजन लावले होते. निवड प्रक्रियेमध्ये वनिता तानाजी भोपळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

माजी सरपंच अनुराधा पाटील यांच्या हस्ते नुतन सरपंच सौ.वनिता तानाजी भोपळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणूकही काढली.
गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. सरकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न करेन. तसेच पोर्ले गावातील मूलभूत गरजा आणि इतर नागरी सुविधा पूरवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून गावातील विकासकामांसाठी विविध निधी आणण्यासाठी पाठपुरावा करून गावचा विकास करेन.
सौ.वनिता तानाजी भोपळे, सरपंच

pm kisan status: ८१ हजार किसानों को योजना से बाहर किया गया है, क्या आपका नाम यादी में है? जांच करें