Tuesday, November 12, 2024

पोर्ले गावात गावगुंडांनी शेतकऱ्याला घरात घुसून मारले

- Advertisement -

पोर्ले तर्फ ठाणे या गावामध्ये रविवारी 11 डिसेंबर रोजी किरकोळ वादावरून काही गुंडांनी एका शेतकऱ्याला तसेच त्यांच्या कुटुंबातील लोकांना घरामध्ये घुसून मारहाण केली. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
शेतातील बांधाच्या किरकोळ वादावरून पांडुरंग भोपळे या शेतकऱ्याला घरी येऊन शहाजी पाटील, प्रदीप पाटील, श्रीकांत पाटील यांनी घरात जाऊन शेतकऱ्याच्या डोक्यात लोखंडी गजाने डोक्यावर घाव घातला. त्यामुळे त्यांना जबर जखम झाली आहे.शेजारील काही लोक अडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण तसेच शिवीगाळ करण्यात आली. अशी माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली. 

शेतकऱ्याची तब्बेत गंभीर असून उपचारासाठी त्यांना CPR हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. रविवारी रात्री उशिरा पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये दिगंबर भोपळे यांनी तक्रार नोंद केली आहे.

खेळीमेळीच पोर्ले गाव आहे. काही गुंडांनी गावात दहशत माजवल्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांचा त्रास होत आहे. त्यांच्या अरेरावीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. याआधीही त्यांनी अश्याच प्रकारे काही लोकांच्या घरी जाऊन लोकांना धमकी देऊन दहशत माजवली आहे. रविवारी घडलेल्या घटनेमुळे पोर्ले गावात UP, बिहार सारख वातावरण होत असल्याची खंत काही नागरिकांनी व्यक्त केली.
या गुंडांना वेळीच आवर घालण्यात यावी अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles