- Advertisement -
15 जुनला 30 हजार नवीन शिक्षक शाळेत रुजू होतील अश्या शासनाच्या पोकळ आश्वासनाला कंटाळून शिक्षकभरतीसाठी Pro. बालुशा माने मॅडम आणि तुषार शेटे यांनी सामान्य अभियोग्यता धारक संघर्ष समितीतर्फे भेट घेतलीयांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार साहेबांची देवगिरी येथे भेट घेतली.
विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षक मिळावेत म्हणून सर्वच रिक्त पदे लवकरच भरण्यात यावीत अशी मागणी केली.
शालेय विभागामार्फत राबविण्यात आलेल्या “शिक्षक अभियोग्यता” चाचणी परीक्षेचा निकाल २४ मार्च २०२३ रोजी जाहीर केला. निकाल लागून 3 महिने उलटले तरीही पवित्र पोर्टल नोंदणीला सुरुवात नाही. शिक्षक भरतीसाठी चातक पक्ष्याप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत.