गणपती दर्शनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha Mumbai Visit) यांचा दोन दिवसीय मुबई दौरा सुरु आहे. राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) दरवर्षी मुंबईत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. आज दि.9 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचे दर्शन घेवून हा दौरा सुरु केला. लालबागचा राजाचे दर्शन घेवून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध बैठका घेणार आहेत त्यामुळे हा दौरा महत्वाचा मानला जातो. या दौऱ्याच्या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी होवू शकतात. विधानसभेची निवडणूक काही महिन्याच्या कालावधीवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकीचे वारे वाहायला सुरु झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून राज्यात विविध मतदारसंघात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा घेतला जातो तसेच उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.
Table of Contents
Toggleबॉम्बे नाही तर मुंबईच नाव पाहिजे: अमित शाह
एका वृत्तपत्रपत्राला बोलताना अमित शाह म्हणाले, बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं अशी मागणी करण्यामध्ये मी देखील होतो, घरात आपण आपल्या मातृभाषामध्ये बोलले पाहिजे असे वक्तव्य अमित शाह यांनी केले.
योग्य ते निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील: अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांनी मुंबई दौऱ्यात भाजप नेत्यांना कानमंत्र देण्यासोबतच मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) महायुतीमध्ये कोणतेही भेदभाव होणार नाही, असे सूचक केले. येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात परंतु, यावर योग्य ते निर्णय काढून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जागावाटपाचा विषय सुरळीत सांभाळतील अशी खात्री अमित शाह यांना आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात असणारी गैरहजरी चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवार यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हवं ते यश मिळालेले नसल्याने अनेक भाजप नेते नाराज आहेत. सध्य परिस्थिती अजित पवार यांची वागणूक ही महायुतीतील नेत्यांना न पटणारी झाली आहे. अजित पवार यांच्याविषयी काही दिवसात योग्य ते निर्णय घ्यावा, याबाबत सूत्रांच्या माध्यमातून अमित शाह यांनी चाचपणी केल्याचे समजते.