राष्ट्रवादीतील फुटी नंतर आपल्याला सोडून गेलेल्या खासदारांना रोखण्यासाठी आणि त्यांच्या विरुद्व दुसरी फळी निर्माण करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) एक वर्ष झाले अवघा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. कोल्हापुरातील विध्यमान दोन आमदार त्यांना सोडून अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघात घेरण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे वेगवेगळ्या रणनीती आखत आहेत. साथ सोडलेल्या आमदारांच्या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
अशातच अजित पवार यांच्यासोबत गेलेले हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना आव्हान देण्यासाठी शरद पवार हे विविध नेत्यांशी संपर्क साधत आहेत सध्या भाजपमध्ये असलेल्या समरजित घाटगे यांना पक्षात घेऊन कागल विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यासाठी पवार प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे काही वरिष्ठ नेत्यांनी कागलमधून उमेदवारीसाठी समरजित घाटगे (Samarjeet Ghatge) यांना संपर्क केल्याचे समजते आतापर्यंत घाटगे यांना पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन वेळा संपर्क करण्यात आला असून उमेदवारीसाठी ही विचारणा करण्यात आली आहे. मात्र घाटगे यांनी अद्याप आपला निर्णय कळवला नसल्याचे त्यांच्या उमेदवारी बाबत संभ्रम आहे.
आगामी विधानसभेबाबत हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी माध्यमांना एक प्रतिक्रिया दिली आहे, माझ्या विरोधात कोण उमेदवार असेल याची मी चिंता करत नाही मी अजित पवार राष्ट्रवादी गट आणि घड्याळ या चिन्हावर माझा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मी आमदार होणार मंत्रिमंडळात ही सहभागी होणार असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.
कागलचा आमदार मीच होणार : हसन मुश्रीफ
नुकत्याच झालेल्या लोकसभेत महाविकासआघाडीकडून कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांना सोडल्या होत्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातच पाच जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली.
या सर्व घडामोडींवर बोलताना समरजित घाटगे यांनी मी भाजपमधून तिकीट मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि जर तिकीट नाही मिळाले तर एकवेळ अपक्ष उभा राहीन पण शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जाणार नाही हे स्पष्ट केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले कि कागलच्या विकासासाठी मी निवडणुकीसाठी उभा राहणारच आहे आणि शंभर टक्के ही निवडणूक जिंकणार आहे.