नोकरभरती घोटाळ्याला आळा घालण्यासाठी विशेष कायदा होणार?

0 10

- Advertisement -

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील, महापरीक्षा पोर्टल, TET घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा नोकरभरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती पेपरफुटी इत्यादी नोकर भरती घोटाळे उघड केले आहेत. TET घोटाळ्यात १०-१२ हजार बोगस उमेदवार सापडले, ६,२००+ पदांची आरोग्य पदभरती पेपरफुटीनंतर रद्द करण्यात आली, महापरिक्षा पोर्टल द्वारे घेण्यात आलेल्या १०-१५०००+ पदांच्या नोकरभरतीत घोटाळे करण्यात आले. घोटाळ्यात सापडलेल्या एकूण उमेदवारांची संख्या हजारोंच्या घरात असून, सदर घोटाळे महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळे आहेत. मंत्रालयात बसलेल्या IAS अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांचे संचालक, दलाल, परीक्षा केंद्र चालक आणि शेकडो उमेदवारांना या घोटाळ्यांमध्ये अटक झाली होती. पुरोगामी महाराष्ट्राचे नावलौकिक या घोटाळ्यांमुळे डागाळले गेले आहे.

वनविभागाच्या भरतीमध्ये गैरप्रकार आढळल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन 

नोकर पदभरतीत घोटाळे करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक संघटित टोळ्या निर्माण झाल्या असून प्रत्येक नोकर पदभरतीत या टोळ्यांद्वारे पेपर फोडले जात आहेत. या टोळ्यांद्वारे विविध जिल्ह्यात दलाल नेमून सामान्य उमेदवारांना हेरले जाते, उमेदवारांना नोकरी लावण्याच्या बदल्यात लाखो रुपये उकळल्या जातात. या टोळ्यांमधील अनेक घोटाळेबाज असे आहेत ज्यांच्यावर विविध नोकर पदभरतीमधील एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. आपल्या राज्यातील कुमकुवत पेपरफुटी कायद्यांमुळे सदर आरोपी लगेच तुरुंगाच्या बाहेर सुटतात. राजस्थान, उत्तराखंड, उत्तरप्रदेश ई. राज्यातही या प्रकारचे नोकर भरती घोटाळे वारंवार झाल्याने, या राज्यांनी नोकर भरती घोटाळे आणि पेपरफुटीबाबत कायदे बनविले. या कायद्यामुळे तेथील पेपरफुटी आणि नोकर भरतीच्या घोटाळ्यांमध्ये कमालीची घट झाली आहे.

….अन्यथा तलाठीभरती परीक्षा रद्द करण्यास लावणार | talathi bharti

विविध राज्यातील पेपरफुटी कायदे पुढील प्रमाणे आहेत :

- Advertisement -

१) राजस्थानच्या नवीन पेपरफुटी कायद्यानुसार नोकरभरती परीक्षा, शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या परीक्षेचा समावेश या कायद्यात केला गेला आहे. परीक्षेत कॉपी करणाऱ्या, कॉपीस मदत करणाऱ्याला ५ ते १० वर्षांची शिक्षा, १० लाख ते १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद केली गेली आहे. कॉपीस मदत करणाऱ्या टोळीच्या सदस्यांची मालमत्ता जप्त करण्याची तसेच परीक्षार्थीनी नोकर भरतीचा फोडलेला पेपर खरेदी केल्यास त्यांना तीन वर्षाच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.

Barti मार्फत MPSC परीक्षेसाठी निशुल्क प्रशिक्षण | ‘येथे’ अर्ज करा

२) उत्तरप्रदेशात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतूद असून घोटाळेबाजांची मालमत्ता जप्त करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

३) उत्तराखंड सरकारने स्पर्धा परीक्षेतील घोटाळे थांबवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात उत्तराखंड स्पर्धा परीक्षा अध्यादेशाला (भरतीत अनुचित साधनांना प्रतिबंध आणि निवारणाचे उपाय) मंजुरी दिली. यानंतर हा अध्यादेश कायदा बनला. या कायद्यान्वये जर कोणता व्यक्ती, प्रिंटिंग प्रेस, परीक्षा घेणारी कंपनी/संस्था संगठितरीत्या पेपर फोडण्याच्या षडयंत्रात सामील असल्याचे सिद्ध झाल्यास त्यातील प्रत्येक व्यक्तीला जन्मठेप व दहा कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आहे. तसेच परीक्षा देणारा कोणताही परीक्षार्थी कॉपी/गैरप्रकार करताना आढळून आल्यास त्याला तीन वर्षांची शिक्षा व दहा लाखांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

महाराष्ट्रतील पेपरफुटी घोटाळ्यांसाठी याप्रकारचे कडक कायदे अस्तित्वात नसल्याने निर्ढावलेले घोटाळेबाज एकामागून एक नोकरभरती पेपर फोडत सुटले आहेत. कायद्याचा धाक नसल्याने प्रत्येक नोकरभरतीचे पेपर फोडण्यात येत आहे आणि एक पेपर फोडल्यानंतर ही मंडळी काहीच दिवसात तुरुंगाबाहेर पुढील पेपर फोडण्यास सज्ज असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाद्वारे याप्रकारचा कडक पेपरफुटी कायदा मंजूर करून घेणे गरजेचे झाले आहे. पेपर फोडणाऱ्या टोळ्या, घोटाळ्यांसाठी जबाबदार असल्या तरी या टोळ्यांची मदत मिळवून नोकऱ्या प्राप्त करणारे सामान्य उमेदवार सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. म्हणून नवीन कायद्यात घोटाळे करून नोकरी प्राप्त करणाऱ्या सर्वसामान्य उमेदवारांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे व कडक शिक्षा आणि दंड ठोठावण्यात यावा. नोकरभरती घोटाळ्यात सामील असणाऱ्या व्यक्तींना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा, १० करोड रुपयांपर्यंत दंड, मालमत्ता जप्ती आणि कॉपी करणाऱ्या परीक्षार्थीस पाच वर्षाची शिक्षा आणि दहा लाखापर्यंत दंड इत्यादी कडक तरतुदी असलेला पेपरफुटी प्रतिबंधक कायदा महाराष्ट्रात मंजूर करून घेण्यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती येणाऱ्या अधिवेशनात सर्वपक्षीय नेत्यांकडून पाठपुरावा करणार आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.