कोल्हापूर जिल्ह्यात आता निवडणुकीचे वारे वहायाला सुरुवात झाली आहे. हातकणंगले विधानसभा (Hatkanangle Aseembly) मतदारसंघाचा विचार केला तर हा राखीव आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जाती (SC) च्या उमेदवारासाठी राखीव आहे. या मतदारसंघाची पुनर्रचना होऊन 2009 साली निर्मिती झाली.
2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुजित मिणचेकर (Sujit MInachekar) हे निवडून आले होते. सुजित मिणचेकर यांच्या विरोधात प्रमुख उमेदवार म्हणून राजू (बाबा) आवळे (Raju Awale) होते. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत राजू (बाबा) आवळे यांचा पराभव झाला परंतु याचाच बदला म्हणून 2019 च्या निवडणुकीत राजू (बाबा) आवळे निवडून आले.
हातकणंगले विधानसभा 2019 निकाल :
उमेदवार | पक्ष | मते | टक्केवारी |
राजू (बाबा) आवळे | कॉंग्रेस | 73720 | 31.57% |
सुजित मिणचेकर | शिवसेना | 66950 | 28.67% |
अशोकराव माने | जनसुराज्य | 44562 | 19.10% |
2019 च्या हातकणंगले विधानसभा (Hatkanangle Aseembly) निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाकडून राजू (बाबा) आवळे यांना 73,720 मते पडली शिवसेनेचे सुजित मिणचेकर यांना 66,950 एवढी मते पडली. 2019 च्या निवडणुकीत आणखीन एक एक प्रमुख उमेदवार होता तो म्हणजे जनसुराज्य पक्षाकडून अशोकराव माने (Ashokrao mane) होते. अशोकराव माने यांना 44,562 मते पडली. यामध्ये राजू (बाबा) आवळे हे 6,770 मताधिक्यांनी निवडून आले.
अनेक राजकीय भूकंप होणार
हातकणंगले विधानसभा (Hatkanangle Aseembly) परिस्थिती पाहता पूर्णपणे वेगळी आहे राजू (बाबा) आवळे (Raju Awale) हे काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत जयवंत आवळे यांचा पाठिंबा आणि काँग्रेस पदाधिकऱ्याकडून मिळणारी ताकद पाहता महाविकास आघाडीमधून त्यांना उमेदवारी मिळेल हे नक्की आहे. परंतु महाविकास आघाडीमधून
सुजित मिणचेकर हे सध्या (उ.बा.ठा) गटात आहेत. महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळाली नाही तर ते महायुतीकडे जाण्याची जास्त संभाव्यता आहे. सुजित मिणचेकर (Sujit MInachekar) हे हातकणंगले विधानसभा (Hatkanangle Aseembly) लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे ते शिवसेना पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरू शकतात.
महायुतीकडून प्रामुख्याने प्रबळ दावेदार हे अशोकराव माने (Ashokrao mane) आहेत कारण सद्यस्थिती पाहता अशोकराव माने हे जनसुराज्य पार्टीमध्ये दिसून येतात परंतु भारतीय जनता पार्टी सोबत त्यांची जवळीक आहे. जनसुराज्य पक्षामधून जर तिकीट नाही मिळाले तर भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक रिंगणात उतरू शकतात.
हातकणंगले विधानसभा (Hatkanangle Aseembly) मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे दाट संभाव्यता आहे त्यामध्ये अशोकराव माने, राजू आवळे आणि सुजित मिणचेकर हे प्रमुख उमेदवार असतील. महायुती आणि महाविकास आघाडीकडून हातकणंगले विधानसभेसाठी उमेवराची चाचपणी सुरु आहे.