Wednesday, November 13, 2024

सुनील तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष -प्रफुल्ल पटेल यांची घोषणा | Maharashtra Political Crisis

- Advertisement -

रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबतीला घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीवर दावा केला. आता शरद पवार यांच्याकडूनही त्या नेत्यांवर कारवाई सुरु झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट आला आहे. Maharashtra Political Crisis

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मोठी घडामोड घडली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. Maharashtra Political Crisis

तसेच अजित पवार यांच्याकडून संघटनात्मक बदल सुरु केले आहेत. संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त कऱण्यात येत आहे. सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या पुढील नियुक्तीचे संपूर्ण अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे राहतील, असे प्रफुल पटेल म्हणाले.

याशिवाय विधिमंडळ नेता म्हणून अजित दादा पवार तर पक्षाने मुख्य प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रफुल पटेल यांनी केली. सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यपदाची  जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरड चव्हाण तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे.

तटकरे यांनी आत्ताच पद स्विकारत कामाला लागावं. हॅंडओव्हरची प्रक्रिया करावी अशी सूचना केली आहे. प्रदेशअध्यक्ष नात्याने बाकी नियुक्त्याच्या अधिकार सुनिल तटकरे करु शकतील. पक्षाच्या धोरणाधिकारे आम्ही हे ठरवलं आहे. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांकडे काही गोष्टी कारवाई केल्या आहेत. माझं म्हणणं एक आहे, कुठल्याही व्यक्तीची बडतर्फीची प्रक्रिया स्पीकरकडे असते. त्यामुळे बाकी इतर गोष्टींकडे गेल्यावर काही होऊ शकणार नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles