Wednesday, November 13, 2024

maharashtra politics चाणक्याला मात देवून फडणवीस राज्याचे महाचाणक्य

- Advertisement -

विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवन येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.

आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, श्री. संजय बाबूराव बनसोडे, श्री. अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. तिचे सरकार पण आले. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बाहेर पडत आघाडीवर पहिला धक्का दिला. त्यानंतर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे समीकरण होते. आता अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतील आमदार तिसरा घटक झाले. त्यामुळे महाविकास आघाडी कोलमडली आहे.

यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना, जे घडलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं घडल्याचं म्हटलं आहे. तर यातून महाराष्ट्रात एक विकासाचा अध्याय लिहू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार आणि मी तिघं मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अतिशय प्रगल्भ, पुरोगामी, विकास करणारं सरकार आम्ही देवू, असंही फडणवीस म्हणालेत.

गेली काही दिवस राज्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय टोमणेबाजी चालू होती. त्यांनी दिलेल्या एक मुलाखतीत पहाटेचा शपटविधी बद्दल शरद पवारांच्या भूमिकेबद्दल विधाने केलेली होतीत. पण एकंदरीत या सर्व घटनेचा अभ्यास करता चाणक्याला मात देवून फडणवीस राज्याचे महाचाणक्य झाले असल्याचे म्हंटले जाते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles