Monday, September 9, 2024

राज्य माहिती आयोगाचा वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

- Advertisement -

नागपूर, दि. २९:  राज्य माहिती आयोग नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा वार्षिक अहवाल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज राजभवन येथे सादर केला. | Annual Report of the State Information Commission submitted to the Governor

जागतिक माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना नागपूर व औरंगाबाद खंडपीठातर्फे मागील वर्षभरात सुनावणी घेऊन निकाली काढलेल्या द्वितीय अपील व तक्रारीसंबंधीचा अहवाल राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी सादर केला. तसेच आयोगाच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता येऊन जनतेला माहिती अधिकार अधिक सुलभपणे वापरता येईल या दृष्टीने लागू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

राज्य माहिती आयोगातर्फे राज्यपालांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आयोगाच्या उपसचिव श्रीमती रोहिणी जाधव, कार्यासन अधिकारी नंदकुमार राऊत तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles