Tuesday, October 8, 2024

शिवसेनेला मोठा धक्का | माथेरानमध्ये शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

- Advertisement -

शिवसेनेने भाजपला मुक्ताईनगरात धक्का दिल्यानंतर आता त्याचा जशास तसा वचपा भाजपने माथेरानमध्ये काढला आहे.  शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (Big blow to Shiv Sena | 10 Shiv Sena corporators join BJP in Matheran)

 शिवसेनेनं विरोध बाकांवरील भाजपाला मुक्ताईनगरमध्ये राजकीय धक्का दिला. भाजपाच्या विद्यमान सात आणि तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं. या राजकीय घडामोडीला २४ तास लोटत नाही, तोच भाजपाने याचा वचपा काढला. भाजपाने माथेरानमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेनेच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यात उपनगराध्यक्षांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोल्हापुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत माथेरानच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप नेते आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.  

मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी बुधवारी 26 मे रोजी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत या 10 आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य 4 जणांचा समावेश आहे.

शिवबंधन तोडून भाजपात दाखल झालेले नगरसेवक

आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष), राकेश चौधरी (नगरसेवक), सोनम दाबेकर (नगरसेवक), प्रतिभा घावरे (नगरसेवक), सुषमा जाधव (नगरसेवक), प्रियांका कदम (नगरसेवक), ज्योती सोनवळे (नगरसेवक), संदीप कदम (नगरसेवक), चंद्रकांत जाधव (नगरसेवक), रुपाली आखाडे (नगरसेवक) यांनी भाजपात प्रवेश केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles