बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनामुळे निधन

0 7

- Advertisement -

सांगली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका देशाला बसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येसोबत मृतांची संख्याही उच्चांक गाठत असून चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालं आहे. तो ३४ वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. चारच दिवसांपूर्वी जगदीश यांची कोरोना विषाणूची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आज अचानक त्याचं निधन झाल्याचं कळल्यानं महाराष्ट्रातल्या त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.

- Advertisement -

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल गावचा असणारा जगदीश लाड हा नवी मुंबई मध्ये राहत होता. नंतर तो वडोदरा येथे स्थायिक झाला होता. तिथे त्याने स्वत:ची व्यायामशाळा सुरु केली होती. जगदीश लाडने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं. मिस्टर इंडिया स्पर्धेतही जगदीश लाडने आपली छाप पाडत दोन वेळा गोल्ड मेडल जिंकलं होतं. दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.