प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 (PM Ujjwala Yojana)विषयी थोडक्यात माहिती 

- Advertisement -

केंद्र शासनाने देशातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांसाठी विशेषतः ग्रामीण महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PM Ujjwala Yojana) 2022, या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरु केली आहे.आपले केंद्रीय भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार देशातील गरिबी वर्गासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहेत. या योजनेसोबतच महिला वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठीही देशातील सरकार प्रयत्नशील आहेत.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना उद्दिष्टे | Objectives of the PM Ujjwala Yojana

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे (PM Ujjwala Yojana) उद्दिष्ट ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील स्त्रिया आणि बालकांना एलपीजीसारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन पुरवून त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हे आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या आरोग्याची तडजोड करण्याची गरज पडणार नाही.
  • देशातील सर्व गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत गॅस उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • ग्रामीण भागात जेथील कुटुंबांकडे LPG गॅस connection नाहीत त्या सर्व कुटुंबांना मोफत गॅस connection उपलब्ध करून देणे सोबतच नवीन गॅस सिलेंडर च्या खरेदीवर सबसिडी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फायदा / लाभ | Benefits of the PM Ujjwala Yojana

  • पूर्वी स्वयंपाकासाठी लाकूड किंवा कोळसा वापरला जायचा. त्यामुळे चुलींमधून निघणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असे. शिवाय इंधनासाठी लाकूडतोडही बऱ्याच प्रमाणात होत असे. त्यामुळे वातावरण प्रदूषणाचे प्रमाणही वाढले होते. मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PM Ujjwala Yojana) लागू झाल्यापासून या सर्वात घट पाहायला मिळत आहे.
  • धुराच्या घातक परिणामांपासूनही महिलांची सुटका झाली आहे.
  • या योजनेचा लाभ देशातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत देशातील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने दुसरा टप्पाही सुरू केला आहे.
  • लाभार्थ्यांना १६०० रु. च्या अनुदानावर एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाईल.
  • लाभार्थ्यांना वर्षभरासाठी ३ एलपीजी सिलेंडर १४.२ किलो वजनाचे दिले जातील.

प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत येणारे लाभार्थी | Beneficiary under the PM Ujjwala Yojana

  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे
  • मागासवर्गीय
  • प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील सर्व SC/ST कुटुंबातील लोक.

प्रधानमंत्री उज्वला योजनेचे नियम व अटी | Rules and Guidelines of the PM Ujjwala Yojana

  • लाभार्थी अर्जदाराच्या नावावर याआधी कुठलेही गॅस कनेक्शन नसावे.
  • अर्जदाराचे नाव 2018 च्या जनगणना यादीत असणे आवश्यक आहे.
  • (PM Ujjwala Yojana) योजनेंतर्गत अर्जदार महिलेचे वय 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्रता | Eligibility for the PM Ujjwala Yojana

  • अर्जदार महिला असणे आवश्यक आहे व ती भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असावी आणि कुटुंबातील इतर कोणाकडेही एलपीजी गॅस कनेक्शन नसावे.
  • अर्जदार महिलेचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराजवळ बीपीएल शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
  • दारिद्र्यरेषेखाली असलेले कुटुंबे, मागासवर्गीय कुटुंबे, वनवासी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हि कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.
  • 14 – सूत्री घोषणेनुसार गरीब कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents for the Scheme

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • फोन नंबर
  • व्यवसाय अनुभव प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज असा करावा? | How to apply for PM Ujjwala Yojana?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही online आणि offline अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

Offline अर्ज प्रक्रिया | Offline Application Process

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी (PM Ujjwala Yojana) अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात.
  • यानंतर, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, नाव, पत्ता इत्यादी अर्जामध्ये विचारलेली माहिती योग्यरित्या भरा.
  • यानंतर, अर्जासोबत तुमची सर्व कागदपत्रे जोडा आणि तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीला सबमिट करा.
  • गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्याने तुमचा अर्ज आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुमचे एलपीजी गॅस कनेक्शन 10 ते 15 दिवसांच्या आत जारी केले जाईल.

Online अर्ज प्रक्रिया | Online Application Process

  • सर्वप्रथम तुम्हाला उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
  • होम पेजवर तुम्हाला Apply For PMUY Connection या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमच्या समोर खालील image मध्ये दाखवल्याप्रमाणे 3 पर्याय येतील.
  • या तीन पर्यायांपैकी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल..
  • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
  • या पेजवर तुम्हाला वितरकाचे नाव, तुमचे नाव, तुमचा पत्ता, मोबाईल नंबर, पिन कोड इत्यादी विचारलेली माहिती टाकावी लागेल.
  • आता तुम्हाला सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • यानंतर तुम्हाला Apply च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles