संभाजीराजेंना पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा; पण मविआची 2022 सारखी खेळी

kolhapur loksabha

शांत असलेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ परत एकदा चर्चेचा विषय बनला आहे. गेली काही दिवस या जागेसाठी अनेक नवीन नावे समोर येवू लागली आहेत. शरद पवार गटाकडून छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा चालू आहे. शुक्रवारी दिवसभर सर्व न्यूज चॅनेलवर याच बतमीची चर्चा रंगू लागली होती. अद्यापही कोल्हापूर लोकसभेबाबत महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून संभ्रमच पाहायला मिळत आहे.

कॉँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेची जागा कॉँग्रेसला मिळावी यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु तिथे विद्यमान खासदार शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट ही जागा कॉँग्रेस ला सोडणार का ही येणारी वेळच सांगू शकेल. शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटनेही ही जागा छत्रपती शाहू महाराज यांना देणार असल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर सर्व न्यूज चॅनेलवर होती.

पुन्हा एकदा संभाजीराजेंना मविआ ची अट

2022 च्या राज्यसभा निवडणूकीत संभाजीराजे यांना निवडणूक लढवायची होती. त्याआधी ते भारतीय जनता पार्टी कडून राज्यसभेवर गेले होते. 2022 ला बऱ्याच राजकीय घडामोडी घडत होत्या. राज्यसभेच्या 6 जागांसाठी जुलैमध्ये निवडणूक (Rajya Sabha Election) होणार होती. त्यात भाजपचे दोन, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ त्या त्या पक्षाकडे होती. अशावेळी सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी आपण अपक्ष उभे राहणार असल्याचं जाहीर केलं होती. त्याचबरोबर सर्व पक्षांनी आपल्याला मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केलेली. संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल असं पवार यांनी जाहीर केलं होत.

kolhapur loksabha |कोल्हापूर लोकसभेसाठी आघाडीच ठरलं; शाहू महाराज निवडणूक रिंगणात ?

तेंव्हा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे 27 मते शिल्लक होते. राजेंना पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण 46 मते शिल्लक होती. संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी 42 मतांची आवश्यकता होती. महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहजरित्या राज्यसभेत गेले असते, पण तस झाल नाही.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही संभाजी राजेंना जर ते अपक्ष लढणार असतील तर पाठिंबा देवू अस जाहीर केले होते. पण शिवसेनेने मात्र संभाजीराजे यांना अट घालून त्यांचा स्वप्नभंग केल्याचे सर्वाना माहिती आहे. परत एकदा महाविकास आघाडीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. इतकंच नाही तर महाविकास आघाडीत समावेश कऱण्याची तयारीही दर्शवली होती. पण यासाठी त्यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तिकीट पाहिजे असेल तर संभाजीराजेंनी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करावा लागेल, अशी अट ठेवण्यात आली होती. यानंतर संभाजीराजे कोणत्या पक्षाची निवड करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान संभाजीराजेंनी ट्विट करून कोणत्याही पक्षात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे. 

https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1753044965582885177?s=20
vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com