Friday, April 19, 2024

Krishnaraj Mahadik| कृष्णराज महाडीक यांची राजकारणात एंट्री ?

- Advertisement -

खासदार धनंजय महाडीक यांचे सुपुत्र, कृष्णराज महाडीक(Krishnaraj Mahadik) यांनी यूट्यूबच्या माध्यमातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातूनच ते सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. मध्यंतरी खासदार धनंजय महाडीक यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना अस विचारण्यात आले होत की तुमचा राजकीय वारसदार कोण, त्यावर त्यांनी कृष्णराज महाडीक यांच्या बद्दलचे अनेक पैलू सांगितले होते.

कोल्हापुरात सध्या राजकीय वातावरण तापलेल आहे. लोकसभेच्या निवडणुकीमुळे वरिष्ठ नेत्यांचे दौरे कोल्हापुरात चालू आहेत. यातच कृष्णराज महाडीक यांनी केलेले मतदार संघातील दौरे, तसेच त्यांनी केलेली सामाजिक कामे यामुळे ते राजकारणात सक्रिय होतील अशी चर्चा गेली काही दिवस मिडिया मध्ये चालू आहे.

उद्धव ठाकरे मोदींना संपर्क करण्याच्या प्रयत्नात ; भाजप सोबत पुन्हा मैत्री करणार ?

आज सोशलमिडियावर कृष्णराज महाडीक (Krishnaraj Mahadik) यांची एक पोस्ट वायरल होत आहे. त्यामध्ये ते खासदार धनंजय महाडीक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दिसत आहेत. “25 फेब्रुवारीला मी एक खूप मोठी घोषणा करणार आहे..#आता सुट्टी नाही 🔥” अशा आशयाचे कॅपशन त्यांनी दिले आहे. यावर त्यांच्या चाहत्यांनी भावी आमदार अश्या कमेन्टचा पाऊस पाडला आहे.

एकंदरीत कोल्हापूरच्या राजकारणात नवीन एका युवा उमेदवाराची एंट्री होईल का ही येणारी वेळच सांगेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles